कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक कसे ठरले

कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक कसे ठरले

कामगारांनी उभे केलेले लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक कसे ठरले ?

उत्तर : 

पहिल्या महायुद्धानंतर भारतात औद्योगिकीकरणामुळे कामगारवर्गाची वाढ झाली. तेव्हा राष्ट्रव्यापी कामगार संघटनेची आवश्यकता वाटू लागली. यातून १९२० साली आयटकची स्थापना झाली..

लाला लजपतराय यांनी आयटकच्या पहिल्या अधिवेशनात कामगारांनी राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे सांगितले. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद इ. समाजवादी नेत्यांनी कामगारांच्या लढाऊ संघटना उभारल्या. १९२८ साली मुंबईतील गिरणी कामगारांनी ६ महिने संप केला. असे अनेक संप रेल्वे कामगार, ताग कामगारांनी केले. कामगार चळवळीची वाढती व्याप्ती व शक्ती पाहन सरकार अस्वस्थ झाले. ही चळवळ दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले. अशा प्रकारे कामगारांनी केलेले लढे राष्ट्रीय चळवळीला पूरक ठरले.

Previous Post Next Post