पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्याना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत

पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्याना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत

पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्याना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत ?

उत्तर :

i) पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो. जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत.

ii) पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. 

iii) त्याने भरलेल्या व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. प्रवासखर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाष्याची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो.

iv) पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार पर्यटना होतो. तेथील हस्तोदयोग व कुटीरोद्योग यांचा आहे. विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते. उदा., स्थानिक खाद्यपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होते.


Previous Post Next Post