टिपा लिहा संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान

टिपा लिहा संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान

टिपा लिहा संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान 

उत्तर : 

मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. या समितीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीत फार मोठे योगदान दिले. आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले. मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर प्रचंड आंदोलन उभे राहिले. या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या आंदोलनात १०६ जण ठार झाले.

१ नोव्हेंबर १९५६ ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर १९५७ ला लोकसभा निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले. ३० नोव्हेंबर १९५७ रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते होणार होते. त्या वेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पोलादपूरजवळ पसरणी घाटात निदर्शने केली. मराठी भाषिकांच्या भावनांची व एकूण परिस्थितीची जाणीव पंडित नेहरूंना करून देण्यात समिती यशस्वी झाली. परिणामी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.


Previous Post Next Post