संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा

संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा

संस्थानांच्या विलीनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा.

उत्तर : 

भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानाच्या विलीनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला. त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला.

भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे, हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले. त्यांच्या या अहवालाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. जुनागढ, हैद्राबाद, काश्मीर यांचा अपवाद वगळता. सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊन सोडविला.

Previous Post Next Post