पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा

पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा

पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा. 

उत्तर : 

१९३८ साली पूर्व खानदेशात अतिवृष्टी होऊन पीक बुडाले. शेतकऱ्यांची स्थिती हलाखीची झाली. शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करून घेण्यासाठी साने गुरुजींनी जागोजागी सभा, मिरवणुका घेतल्या. कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. १९४२ च्या क्रांतीत मोठ्या प्रमाणावर शेतकरी सामील झाले.

साने गुरुजींनी कामगारांची एकजूट बांधली. धुळे-अंमळनेर ही कामगार संघटनांची प्रबळ केंद्रे बनविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अंमळनेरच्या गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. अशा प्रकारे साने गुरुजींनी पूर्व खानदेशात कार्य केले. 

Previous Post Next Post