आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो

आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो

आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा का ठरतो ?

उत्तर : 

आधुनिक भारताच्या जडणघडणीत राजकीय स्वातंत्र्याचा लढा महत्त्वाचा होता. हा लढा मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या बरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण या गोष्टींना विरोध होऊ लागला. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही महत्त्वाचे वाटू लागल्याने शेतकरी, दलित, स्त्रिया, कामगार यांनी उभारलेल्या चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा, समाजवादाचा प्रवाह यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत फार मोठे योगदान आहे. म्हणून भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्त्वाचा ठरतो

Previous Post Next Post