भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा

भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा

भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे. स्पष्ट करा.

उत्तर :

i) लोकसंख्या ही देशाची साधनसंपत्ती आहे. बुद्धिमत्ता ही मानवी क्षमता निश्चित करते. देशातील साधनसंपत्तीचा विकास करण्यासाठी त्या देशातील मनुष्यबळ उपयुक्त असतात. 

ii) मनुष्य हा अत्यंत क्रियाशील प्राणी असून आपल्या गरजा भागविण्यासाठी त्याला विविध प्रकारच्या सेवा यांच्यामध्ये आमुलाग्र बदल करावा लागतो. 

iii) भारतात ज्या भागात लोकसंख्या जास्त आहे त्या भागात अनेक उद्योगधंदे निर्माण झाले आहेत. 

iv) नवनवीन उद्योगांची स्थापना होत असल्यामुळे लक्षावधी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत. अर्थातच देशाचा आर्थिक विकास होऊन राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. 

v) विकसित उद्योगधंदयामुळे वाढत्या लोकसंख्येतील प्रशिक्षित लोकांना रोजगार उपलब्ध होऊन अंतर्गत व्यापाराचे क्षेत्र वाढून उत्पादन ही वाढविता येणे शक्य होते. अर्थातच अंतर्गत व्यापार वाढल्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात.

Previous Post Next Post