माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा

माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा

माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा

उत्तर :

माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. 

i) माहिती तंत्रज्ञान उद्योग ही अभियांत्रिकीची शाखा असून तिचा उपयोग संगणकाद्वारे केला जातो. माहिती संग्रहित करणे, शोधून काढणे व पुढे पाठविण्याचे काम या शाखेत केले जाते. 

ii) यातील महत्त्वाचे क्षेत्र संपादन, प्रक्रिया संग्रहण आणि शाब्दिक चित्रे, मूळ ग्रंथांचे व सांख्यिकी माहितीचे विश्लेषण करून सूक्ष्म इलेक्ट्रॉनिकच्या आधारे संगणक व दूरसंपर्क साधनांद्वारे पाठविली जातात. 

iii) माहिती तंत्रज्ञानाचे स्पष्टीकरण म्हणजे संगणकावर आधारित माहिती प्रणालीचे, विशेष करून माहिती घालणे व संगणकीय यंत्रणेबाबत, आकृतिबंध, विकसन उपयोजन आणि व्यवस्थापन करणे होय. 

iv) आज संगणकीकृत व तंत्रज्ञानीय घटकांची वाढ बरीच झाली आहे. विविध प्रकारांमध्ये माहिती ही संगणकात संग्रहित केली जाते व तिचा जगभर वापर केला जातो. या माहिती प्रसारणासाठी कोणतेही भौगोलिक अडथळे येत नाहीत. 

v) नवीन पिढी यातील नवी क्षेत्रे स्वीकारत आहेत. जसे की, संगणकीय जाळी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, वैश्विक माहिती प्रणाली, क्लाऊड कम्प्युटिंग इ. या उद्योगात उच्च, कुशल मजूरवर्ग आवश्यक असतो. 

vi) अलिकडील काळात माहिती तंत्रज्ञानाची क्षेत्रे वाढली आहेत. भारतात या उद्योगास पूरक परिस्थिती लाभल्याने अनेक क्षेत्रे वाढली आहेत. म्हणूनच परदेशीकृत कंपन्या वाढल्या आहेत.

Previous Post Next Post