डी.एन.ए रेणूची रचना स्पष्ट करा

डी.एन.ए रेणूची रचना स्पष्ट करा

 

 

प्रश्न

डी.एन.ए रेणूची रचना स्पष्ट करा.

उत्तर

 

i) डी.एन.ए रेणूची रचना सर्व सजीवांत सारखीच असते. डी.एन.ए रेणूतील प्रत्येक धागा न्युक्लीओटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. 

ii) नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनीन, ग्वानीन, सायटोसीन व थायमीन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनीन व ग्वानीन यांना प्युरिन्स म्हणतात तर सायटोसीन व थायमीन यांना पिरिमिडीन्स म्हणतात. 

iii) न्युक्लीओटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. 

iv) नायट्रोजनयुक्त पदार्थ चार प्रकारचे असल्यामुळे न्युक्लिओटाइडसुद्धा चार प्रकारचे असतात. 

v) डी.एन.ए. च्या रेणूमध्ये न्युक्लीओटाइडची रचना साखळीसारखी असते. डी.एन.ए चे दोन धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील दोन खांब. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हाइड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. नेहमीच ॲडेनीनची थायमीन बरोबर व ग्वानीनची सायटोसीन बरोबर जोडी होते.


Previous Post Next Post