गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा

गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा

 

 

प्रश्न

गुणसूत्रे म्हणजे काय हे सांगून त्याचे प्रकार स्पष्ट करा.

उत्तर

 

सजीवांच्या पेशीकेंद्रकात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. 

गुणसूत्राचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत.

i) मध्यकेंद्री (Metacentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्यावर असतो व हे 'V' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्र भुजा समान लांबीच्या असतात. 

ii) उपमध्यकेंद्री (Sub-metacentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे 'L' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभूजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते. 

iii) अग्रकेंद्री (Acrocentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाजवळ असतो. व हे 'J' या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्रभुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते.

iv) अंत्यकेंद्री (Telocentric) - या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू टोकाला असतो व हे ‘I’ या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते.


Previous Post Next Post