राष्ट्रीय सभेने फाळणीला मान्यता दिली

राष्ट्रीय सभेने फाळणीला मान्यता दिली

विधाने सकारण स्पष्ट करा.

राष्ट्रीय सभेने फाळणीला मान्यता दिली. 

उत्तर : 

लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचार विनिमय केला. त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली गेली. राष्ट्रीय सभेचा फाळणीला तीव्र विरोध होता. देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेंचा मूळ आधार होता; परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टाहास धरला; त्यामुळे फाळणीशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. राष्ट्रीय सभेने अत्यंत नाइलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली.

Previous Post Next Post