संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली

सकारण स्पष्ट करा.

संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.

उत्तर : 

मराठी भाषक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला. राज्यभर असंतोष धुमसत होता. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली. यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार समितीच्या अध्यक्षपदी श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्षपदी डॉ. त्र्यं. रा. नरवणे, तर सचिवपदी एस.एम. जोशी यांची निवड झाली. या समितीची स्थापना करण्यात ग. त्र्यं. माडखोलकर आचार्य प्र. के. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार ठाकरे, य. कृ. सोवनी. सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एकसंघता येण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली.

Previous Post Next Post