भारत सरकारने निजमाविरुद्ध पोलिस कारवाई सुरू केली

भारत सरकारने निजमाविरुद्ध पोलिस कारवाई सुरू केली

विधाने सकारण स्पष्ट करा.

भारत सरकारने निजमाविरुद्ध पोलिस कारवाई सुरू केली. 

उत्तर : 

१९४७ च्या जुलैमध्ये हैद्राबाद स्टेट काँग्रेसने हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. मात्र निजामाने भारतविरोधी धोरण स्वीकारले. तो हैद्राबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लागला. निजामाचा सहकारी कासीम रझवी याने लोकांची चळवळ दडपण्यासाठी रझाकार नावाची संघटना स्थापन केली.

या संघटनेने हिंदूंवरच नाही तर लोकशाहीवादी मुस्लिमांवरसुद्धा अत्याचार केले. अशात भारत सरकार निजामाशी सामोपचाराने बोलणे करण्याचा प्रयत्न करत होते; परंतु निजाम साथ देत नव्हाता. अखेरीला भारत सरकारने १३ सप्टेंबर १९४८ रोजी निजामांविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. याला ‘ऑपरेशन पोलो' हे सांकेतिक नाव होते. शेवटी १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजाम शरण आला व हैद्राबाद संस्थान भारतात विलीन झाले.

Previous Post Next Post