पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा

पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या सांगून त्यावर उपाययोजना सुचवा

उत्तर

 

पर्यटनाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या - i) बरीच अशी पर्यटन ठिकाणे भारतात आहेत. परंतु त्या ठिकाणाची वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने र्यटकांना त्रास सहन करावा लागतो. 

ii) पर्यटकांच्या राहण्याच्या, खाण्या, पण्याच्या व्यवस्था नसतात. 

iii) पर्यटन ठिकाणांचे मार्ग नीट समजत नाही. याठिकाणी कुठेही चिन्हांचे संकेत नसल्याने पर्यटकांचा स्थळ शोधण्यात वेळ जातो. 

iv) पुरेशा सोयी सुविधांअभावी अनेक पर्यटन स्थळांमध्ये सुलभता नाही.


पर्यटनांतील समस्यांवरील उपाय - i) प्रत्येक पर्यटनाच्या ठिकाणामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाचे समान प्रमाणात वाटप केले पाहिजे. ज्यामुळे तेथील पर्यटक तिथे पोहोचण्यास मदत होईल. 

ii) जुन्या व पुरातन सांस्कृतिक वारसा संसाधनांचे संवर्धन केले पाहिजे. आणि मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मूळ शैलीत नूतनीकरण करावे. 

iii) सर्व पर्यटन स्थळांमध्ये आवश्यक सुविधा तसेच सुरक्षा पुरविण्यात यायला हवी. 

iv) पर्यटन स्थळी प्रदूषित झालेल्या भागात स्वच्छता कार्यक्रम सुरू करावा. 

v) स्थानिक सामग्रीचा वापर करून पर्यटकांना आवश्यक असलेले सामान उत्पादन करावे. 

vi) बँकिंग सुविधा, विपणन आणि इतर पर्यटक केंद्र वाढविले पाहिजे. 


Previous Post Next Post