पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो

पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो

 

 थोडक्यात उत्तरे लिहा

प्रश्न

पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.


उत्तर

 

i) पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. 

ii) पर्यटनातून उपहारगृहे, दुकाने, वाहतूक व्यवस्था, मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो. 

iii) पर्यटन स्थळाची संपूर्ण माहिती असणारे व्यक्ती पर्यटकांना तेथील सविस्तर माहिती सांगतात. त्या मोबदल्यात ते तेथील लोकांना पैसे देतात. हा एकप्रकारचा त्यांचा रोजगार आहे. 

iv) तसेच स्थानिक लोक आपल्या घरी पर्यटकांना पेइंगेस्ट म्हणून काही दिवसांसाठी ठेवतात आणि त्यांची खाण्यापिण्याची सोय करतात. त्याचा मोबदला त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळतो. म्हणून पर्यटनामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.


Previous Post Next Post