इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2022 प्रश्न उत्तरे

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2022 प्रश्न उत्तरे

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र बोर्ड परीक्षा 2022 प्रश्न उत्तरे

10 वी बोर्ड परीक्षा 2022 इतिहास व राज्यशास्त्र पूर्ण उत्तरे

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा 2022 इतिहास व राज्यशास्त्र पूर्ण उत्तरे

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका


1. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ................. यांनी सुरू केले. 

अ) जेम्स ऑगस्टस हिकी 

ब) सर जॉन मार्शल 

क) अँनल ह्यूम

ड) मायकेल फुको

उत्तर :

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. 


2) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक .................. हे होते. 

अ) अलेक्झांडर कनिंगहॅम

ब) विल्यम जोम्स

क) जॉन मार्शल 

ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर

उत्तर :

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम हे होते. 


3) कोलकाता येथील .................... हे भारतातील पहिले संग्रहालय होय. 

अ) गव्हर्मेंट म्युझियम 

ब) राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय

क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

ड) भारतीय संग्रहालय

उत्तर :

कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. 


ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. 

1) 

i) बेंजामिन ट्युडेला - स्पेन 

ii) मार्को पोलो - इटली 

iii) इब्न बतूता - भारत 

iv) युआन श्वांग - चीन 

उत्तर :

चुकीची जोडी : इब्न बतूता - भारत 


2) 

i) मल्लखांब - शारीरिक कसरतीचा खेळ 

ii) कबड्डी - मेदानी खेळ 

iii) आईस हॉकी - साहसी खेळ 

iv) आट्यापाट्या - बैठे खेळ 

उत्तर :

चुकीची जोडी :  आट्यापाट्या - बैठे खेळ 


3) 

i) जेम्स ऑगस्टस् हिकी - बेंगाॅल गॅझेट 

ii) बाळशास्त्री जांभेकर - दर्पण 

iii) भाऊ महाजन - ज्ञानोदय

iv) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक - केसरी

उत्तर :

चुकीची जोडी :   भाऊ महाजन - ज्ञानोदय


2. अ) दिलेल्या सुचनेनुसार कृती करा (कोणतेही दोन) :

1) इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा :


उत्तर :


2) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :


उत्तर :


3) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा :


उत्तर :


ब) थोडक्यात टिपा लिहा (कोणत्याही दोन) :

1) वंचितांचा इतिहास 

उत्तर :

i) समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समूहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास' असे म्हणतात.  

ii) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली.  

iii) इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. 

iv) भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.


2) व्हाॅल्टेअर 

उत्तर :

i) व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्स्वा मरी अरूए असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. 

ii) त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहासलेखनाचा जनक होता असे म्हणता येईल.


3) लुव्र संग्रहालय

उत्तर :

i) पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या अठराव्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. 

ii) त्यामध्ये लिओनादाँ द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या 'मोनालिसा' या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. 

iii) लिओनार्दो द विंची फ्रान्सचा सोळाव्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. 

iv) नेपोलिअन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुत्र संग्रहातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील ३ लाख ८० हजाराहून अधिक कलावस्तू आहेत.


3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. 

उत्तर :

भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे, कारण -

i) आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

ii) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते. 

iii) विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नदया, पर्वत, जंगले, अभयारण्ये, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो परदेशातून येतात. 

iv) भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात. हा सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे.


2) वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 

उत्तर :

i) एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. 

ii) दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.

iii) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरांतून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.

iv) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावाच लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.


3) खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. 

उत्तर :

मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळे खेळणी ही इतिहासलेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे. 

i) खेळण्यांमुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात.

ii) मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो.

iii) उत्खननात पाँपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्या प्राचीन संबंधांवर प्रकाश पडतो.

iv) मोहेंजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यांवरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती होते. म्हणून खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.


4) बाळ ज. पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे. 

उत्तर :

i) क्रिकेट सामन्यांचे मराठी भाषेतून समालोचन पूर्वी बाळ ज. पंडित करत असत. 

ii) आकाशवाणीवरून हे धावते वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. 

iii) हे समालोचन करताना बाळ पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. 

iv) त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळे त्यांचे समालोचन  रंजक व्हायचे. 


4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :


सोहगौडा ताम्रपट : हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.


1) सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला ?

उत्तर :

सोहगौडा ताम्रपट जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश येथे सापडला. 


2) सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे ?

उत्तर :

सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे. 


3) सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर :

सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.


5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही दोन) :

1) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ?

उत्तर :

इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल, याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. या इतिहासाचा वर्तमानकाळाशी पुढीलप्रमाणे सहसंबंध असतो -  

i) भूतकाळातील घटनांच्या आधारावरच मानव वर्तमानकालीन वाटचाल निश्चित करतो.  

ii) आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, त्यांचा वारसा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशाचा इतिहास पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन करता येते.   

iii) उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना घेणे शक्य होते. वर्तमानातील समस्यांची सोडवणूक करता येते. सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन होते.


2) आकाशवाणीचा इतिहास लिहा.

उत्तर :

i) स्वातंत्र्यपूर्व कालखंडात १९२४ मध्ये 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' (आयबीसी) या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले. 

ii) नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस' (आयएसबीएस) असे नामकरण केले. ८ जून १९३६ रोजी या कंपनीचे नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ' (एआयआर) असे झाले.

iii) भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. 

iv) ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ‘आकाशवाणी' हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. 

v) त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. 

vi) ‘विविधभारती' या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे २४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खासगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदा., रेडिओ मिर्ची.


3) मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा

उत्तर 


 मैदानी खेळ

 बैठे खेळ

 

1. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. 

2. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. 

3. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. 

4. शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो. 

5. मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. आनंदही आधिक मिळतो. 

6. मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. 

7. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो-खो, क्रिकेट अशा देशी-विदेशी खेळांचा समावेश होतो. 


 

1. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर, कोठेही खेळता येतात. 

2. बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते.    

3. या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. 

4. शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही. 

5. बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. 

6. बैठ्या खेळांना शारीरिक गरज कौशल्याची नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते. 

7. बैठ्या खेळांत बुद्धीबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो.  


4) पर्यटन आणि आतिथ्यक्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्याना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत ?

उत्तर :

i) पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो. जर आपण त्याकडे व्यावसायिक पद्धतीने लक्ष दिले तर हा एक कायमस्वरूपी व्यवसाय आहे. यात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यास प्रचंड संधी आहेत.

ii) पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. 

iii) त्याने भरलेल्या व्हिसा फीमुळे आपल्या देशाला महसूल मिळतो. प्रवासखर्च, हॉटेलमध्ये राहणे, खाणे, दुभाष्याची मदत घेणे, वर्तमानपत्रे, संदर्भ साहित्य विकत घेणे, आठवण म्हणून स्थानिक वस्तू विकत घेणे एवढ्या गोष्टी पर्यटक मायदेशी जाईपर्यंत करतो.

iv) पर्यटन केंद्रांच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार पर्यटना होतो. तेथील हस्तोदयोग व कुटीरोद्योग यांचा आहे. विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीत वाढ होते. उदा., स्थानिक खाद्यपदार्थ, तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू इत्यादी गोष्टी पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारात वाढ होते.

                  राज्यशास्त्र

6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :

1) लोकशाहीचा गाभा म्हणजे ................

अ) प्रौढ मताधिकार 

ब) सत्तेचे विकेंद्रीकरण 

क) राखीव जागांचे धोरण 

ड) न्यायालयीन निर्णय 

उत्तर :

लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण 


2) स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील ....................  या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. 

अ) कोळी 

ब) गोंड

क) भिल्ल

ड) रामोशी

उत्तर :

स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील गोंड  या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. 


7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा (कोणतेही दोन) :

1) न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. 

उत्तर :

हे विधाने बरोबर आहे; कारण 

i) संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिले आहेत. 

ii) न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिले आहेत त्यांत बालकांचे हक्क मानवी हक्कांची जपणूक महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज व्यक्तिस्वातंत्र्य आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश करता येईल.  

iii) या विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. 


2) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते. 

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण -

i) निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. 

ii) राज्यसरकारवर ही जबाबदारी टाकल्यास सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल.

iii) म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे; त्यामुळे एखादया घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यांत निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.


3) ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे कारण -

i) अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा ग्राहकांवर परिणाम होत असतो.

ii) भेसळ, वस्तूंच्या वाढवलेल्या किमती, वजन-मापातील फसवणूक, वस्तूंचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादींसारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागले

iii) अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी १९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी 'ग्राहक चळवळ' अस्तित्वात आली.


8. अ) पुढील संकल्पना स्पष्ट करा (कोणतेही एक) :

1) बहुपक्ष पद्धती 

उत्तर : 

अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी-अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो. अशी पद्धती बहुपक्ष पद्धती' म्हणून ओळखली जाते.


2) जलक्रांती 

उत्तर : 

i) भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र सिंह यांनी राजस्थान येथे मोठी जलक्रांती घडवून आणली आहे. 

ii) राजस्थानमध्ये हजारो "जोहड' (नदयांवरील मातीचे बंधारे) निर्माण करण्याच्या माध्यमातून राजेंद्र सिंह प्रसिद्धीस आले होते. सिंह यांनी राजस्थानच्या वाळवंटात नदया पुनरुज्जीवित केल्या. 

iii) त्यांनी तरुण भारत संघ या संघटनेची स्थापना करून शेकडो गावांमध्ये सुमारे अकरा हजार जोहड निर्माण केले. 


ब) दिलेल्या सुचनेनुसार कृती करा (कोणतीही एक) :

1) पुढील ओघतक्ता पूर्ण करा :

निवडणूक प्रक्रिया :


उत्तर :


2) दिलेल्या आकृतीबंध पूर्ण करा :


उत्तर :

9. पुढील प्रश्नांचे थोडक्यात उत्तरे लिहा (कोणतेही एक) :

1) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मानाची व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ?

उत्तर :

न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली.

i) घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन या कायदयांवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

ii) वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली.

iii) प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली.

iv) खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी जुलमी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयातून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले.


2) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते.

उत्तर :

i) कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते.

ii) चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी-अधिक करायची यांबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते.

iii) खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळवू शकते व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकते, म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते.


Previous Post Next Post