इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका

इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका 2020

इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र सराव प्रश्नपत्रिका

इयत्ता दहावी इतिहास प्रश्नपत्रिका

प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. 

1. मथुरा शिल्पशैली ................ काळात उद्याला आली. 

अ. कुशाणा 

ब. गुप्त 

क. राष्ट्रकूट 

ड. मौर्य

उत्तर :

मथुरा शिल्पशैली कुशाणा काळात उद्याला आली. 


2. ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात '................' म्हणून साजरा केला जातो. 

अ. वृत्तपत्र दिन 

ब. पत्रकार दिन 

क. मुद्रण दिन 

ड. नियतकालिक दिन 

उत्तर :

६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन ' म्हणून साजरा केला जातो. 


3. बाबुराव पेंटर यांनी '...............' हा चित्रपट काढला. 

अ. भक्त पुंडलिक 

ब. राजा हरिश्चंद्र

क. सैरंध्री

ड. बाजीराव-मस्तानी

उत्तर :

बाबुराव पेंटर यांनी 'सैरंध्री' हा चित्रपट काढला. 


प्रश्न. 1. ब. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. 

1) 

 i. कुटीयट्टम  -  केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा

ii. रम्मन  -  पश्चिम बंगालमधील नृत्य

iii. रामलीला  -  उत्तर भारतातील सादरीकरण 

iv. कालेबेलिया  - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य

उत्तर : 

चुकीची जोडी : रम्मन  -  पश्चिम बंगालमधील नृत्य


2) 

i. कुतुबमिनारचे बांधकाम पूर्ण केले - अल्तमश

ii. ताजमहालची बांधणी - सम्राट अकबर 

iii. गोलघुमट - मोहम्मद आदिलशाहाची कबर

iv. सांची व भारहूत स्तूपांची बांधणी - सम्राट अशोक

उत्तर :

चुकीची जोडी : ताजमहालची बांधणी - सम्राट अकबर 


3) 

i. थोरले माधवराव पेशवे - वि. ज. कीर्तने

ii. संगीत शाकुंतल - अण्णासाहेब किर्लोस्कर

iii. संगीत शारदा - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर 

iv. संगीत मानापमान - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

उत्तर :

चुकीची जोडी : संगीत शारदा - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर 


प्रश्न. 2. अ. दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा. 

1) पुढील तक्ता पूर्ण करा. 

 जेम्स मिल 

 द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया 

 जेम्स ग्रँड डफ 

................................. 

 ............................

 द हिस्टरी ऑफ इंडिया

 श्री.अ.डांगे

 ................................

 .............................

 हू वेअर द शूद्राज


उत्तर : 

 जेम्स मिल 

 द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया 

 जेम्स ग्रँड डफ 

 द हिस्टरी ऑफ द मराठाज 

 माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन  

 द हिस्टरी ऑफ इंडिया

 श्री.अ.डांगे

 प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

 हू वेअर द शूद्राज



2) पुढील आकृतीबंध पूर्ण करा.



उत्तर :

3) पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 




उत्तर :



प्रश्न. 2. ब. थोडक्यात टिपा लिहा. 

1. ॲनल्स प्रणाली

उत्तर 


i) राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचारप्रणालीलाच 'ॲनल्स प्रणाली' असे म्हणतात.

ii) 'ॲनल्स' (Annals) म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे, तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी "ॲनल्स प्रणाली' फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.

2. दूरदर्शन

उत्तर 

i) दूरदर्शन हे दृक्-श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलत्चित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय.

ii) जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. 

iii) सामाजिक समस्या, शैक्षणिक-आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ दूरदर्शनवर पाहायला मिळतात.

iv) खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. सर्व प्रसारमाध्यमांत दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे.


3. कृषी पर्यटन 

उत्तर 

i) शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'कृषी पर्यटन' होय.

ii) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत. त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत.

iii) कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागांत घेतले जातात. सिक्कीमसारखे राज्य सेंद्रिय उत्पादक राज्य' म्हणून घोषित झाले आहे.

iv) पावसाचे प्रमाण कमी असूनही इझ्राएलसारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम पाहण्यासाठी तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी शेतकरी, विदयार्थी, शहरी लोक जात असतात. परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.


प्रश्न. 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 

1. प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली. 

उत्तर :

i) इंग्रजी शिक्षणाने भारतीयांत निर्माण झालेल्या आत्मजाणिवेने राष्ट्रवादी इतिहासलेखनास प्रवृत्त केले.  

ii) ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतांतील इतिहासलेखकांनी विरोध केला.  

iii) आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले.  

iv) राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा प्रभाव होताच; त्यातूनच प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली.


2. कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. 

उत्तर :

i) कलावस्तूंच्या खरेदी-विक्रीचे एक स्वतंत्र क्षेत्र असते. या कलावस्तू नकली आहेत की खऱ्या आहेत हे माहीत व्हायला हवे.   

ii) त्यांतील धातू, लाकडाचा प्रकार, त्यांचा दर्जा योग्य आहे का हे त्यातील जाणकारच सांगू शकतो.   

iii) कलावस्तूतील कलेचा दर्जा कसा आहे, हे कलाकारच ओळखू शकतात.  

iv) एकूण कलावस्तूंचे मूल्य ठरवताना वरील सर्व गोष्टींची पारख होणे आवश्यक असते, त्यासाठी कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.


3. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 

उत्तर :

i) एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो.   

ii) दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात.  

iii) वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरांतून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात.  

iv) वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा ५०-७५ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावाच लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते.


4. सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. 

उत्तर :

i) विसाव्या एकविसाव्या शतकात खेळांचे आंतरराष्ट्रीयीकरण झाले आहे.   

ii) प्रत्येक खेळाचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यात एकाच वेळी होत असते.  

iii) हौशी खेळाडू शिकण्यासाठी प्रेक्षक मनोरंजनासाठी आणि निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यांवर येतात.  

iv) मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनांच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपणादरम्यान करीत असतात. या कारणांमुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे.


प्रश्न. 4. दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

जगातील सर्वांत प्राचीन समजले जाणारे (इ. स. पू. ६ वे शतक) संग्रहालय मेसोपोटेमियातील 'उर' या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी १९२२ ते १९३४ या काळात केले होते. हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होते. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका (Clay tablets) होत्या.

प्रश्न :

1. जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय कोठे सापडले ?

उत्तर :

जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील 'उर' या प्राचीन शहरात सापडले. 


2. हे संग्रहालय कोणी बांधले होते ?

उत्तर :

हे संग्रहालय मेसोपोटेमियाची राजकन्या एनिगॉल्डी हिने बांधले. 


3. 'उर' येथील वस्तुसंग्रहालयाची कोणती वैशिष्ट्ये तुम्हांला सांगता येतील ?

उत्तर :

'उर' येथील वस्तुसंग्रहालयाची वैशिष्ट्ये - 

i) हे संग्रहालय जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय आहे. 

ii) या संग्रहालय ठेवलेल्या वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका म्हणजे अक्षरे कोरलेल्या मातीच्या पाट्याही होत्या. 


प्रश्न. 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धांत स्पष्ट करा. 

उत्तर :

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने 'वर्गसंघर्षाचा सिद्धांत' मांडला. त्याच्या मते -   

i) इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.   

ii) मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात.  

iii) समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष सुरू होतो.   

iv) उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे.


2. मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा

उत्तर 


 मैदानी खेळ

 बैठे खेळ

 

1. मैदानी खेळ मैदानात उभे राहून खेळायचे असतात. 

2. मैदानी खेळांसाठी कसरतीची व कौशल्याची अधिक गरज असते. 

3. मैदानी खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज असते. 

4. शक्ती अधिक खर्च झाल्याने या खेळांत थकवा लवकर येतो. 

5. मैदानी खेळांत थरारकता, रोमांच असतो. आनंदही आधिक मिळतो. 

6. मैदानी खेळांत शारीरिक कौशल्याची गरज असल्याने प्रशिक्षणाची, सरावाची गरज असते. 

7. मैदानी खेळांमध्ये कबड्डी, हॉकी, खो-खो, क्रिकेट अशा देशी-विदेशी खेळांचा समावेश होतो. 


 

1. बैठे खेळ बसून खेळावे लागतात व ते घरात, मोकळ्या जागेत, पारावर, कोठेही खेळता येतात. 

2. बैठ्या खेळांत तुलनेने कमी कसरतीची व कौशल्याची गरज असते.    

3. या खेळांना शारीरिक क्षमतेची, शक्तीची गरज नसते. 

4. शक्तीची गरज नसल्याने या खेळांमध्ये थकवा लवकर येत नाही. 

5. बैठ्या खेळांत थरारकता नसते. रोमांच नसल्याने आनंद कमी मिळतो. 

6. बैठ्या खेळांना शारीरिक गरज कौशल्याची नसल्याने प्रशिक्षण व सरावाची तितकीशी गरज नसते. 

7. बैठ्या खेळांत बुद्धीबळ, सारीपाट, पत्ते इत्यादी खेळांचा समावेश होतो.  


3. वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा. 

उत्तर :

पर्यटनाचे वैयक्तिक आणि देशालाही पुढील फायदे होतात -  

i) पर्यटनामुळे स्थानिक रोजगार वाढतात.  

ii) नव्या बाजारपेठा निर्माण होऊन पर्यटनस्थळांचा विकास होतो.  

iii) नव्या वसाहती निर्माण होतात व खेड्यांचे पुनरुज्जीवन होते.   

iv) जागतिक पर्यटन वाढून देशाला परकीय चलन मिळते.  

v) हस्तोदयोग, कुटीरोदयोग वाढीस लागून लोकांचे राहणीमान सुधारते.   

vi) विविध स्थळे, निसर्ग, संस्था यांना भेटी देऊन माहिती मिळते, ज्ञान मिळते, माणसे बहुश्रुत होतात.  

vii) विविध प्रकारचे भिन्न भाषिक व भिन्न संस्कृतींचे लोक एकत्र येतात. त्यातून सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य वाढीस लागते.  

viii) ऐतिहासिक स्थळे पाहून आपल्या वैभवशाली इतिहासाचे दर्शन होते. चांगल्या भविष्याची प्रेरणा मिळते.

ix) पूर्वजांचा हा सांस्कृतिक वारसा व ठेवा आपण जपला पाहिजे याची जाणीव होते.  

x) पर्यटनातून वैयक्तिक आणि सांधिक स्वरूपाचा आनंद, ज्ञान व अनुभव मिळतो.


4. कोश म्हणजे काय ते सांगून कोशाची आवश्यकता स्पष्ट करा. 

उत्तर :

शब्दांचा, विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे 'कोश' होय. शब्दांचा व ज्ञानसंवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे कोश" होय.  

कोशाची आवश्यकता :  

i) कोशामुळे ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचून त्याची जिज्ञासापूर्ती होते.  

ii) कोशांमधून ज्ञान, माहिती व संदर्भ सहज आणि सोप्या पद्धतीने मिळत असल्याने वाचकाला त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते.   

iii) कोश संशोधक व अभ्यासकांना त्यांच्या विषयाचे पूर्वज्ञान व माहिती देतात, त्यामुळे त्यात भर घालण्याची प्रेरणाही कोश देतात.  

iv) कोशवाङ्मय हे राष्ट्राच्या सांस्कृतिक, बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात. म्हणून समाजाचा बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रत्येक भाषिक समाजात कोशवाङ्मय निर्माण होण्याची गरज असते.



प्रश्न. 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 

1. महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ................ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 

अ. २५%

ब. ३०%

क. ४०%

ड. ५०%

उत्तर :

महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ५०% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. 


2. जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ............ हे होय. 

अ. धार्मिक संघर्ष 

ब. नक्षलवादी कारवाया

क. लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे

ड. गुंडगिरीला महत्त्व

उत्तर :

जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे हे होय. 


प्रश्न. 7. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 

1. संविधानाचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे; कारण

i) संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते. 

ii) संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो.

iii) संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्याचे स्वरूप एखादया जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.


2. द्रविड मुन्नेत्र कळघम हा राष्ट्रीय पक्ष आहे. 

उत्तर :

हे विधान चूक आहे; कारण

i) भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून, राष्ट्रीय वा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो.

ii) संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो.

iii) द्रविड मुन्नेत्र कळघम हा 'राष्ट्रीय पक्ष' म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो तमिळनाडू राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय नव्हे, तर प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिलेली आहे.


3. लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते. 

उत्तर :

हे विधान बरोबर आहे, कारण

i) लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही; तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे.

ii) लोकशाहीतील लोकांचे हक्क, स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.

iii) भ्रष्टाचार, हिंसा, गुन्हेगारीकरण यांसारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात. त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते.


प्रश्न. 8. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 

1. मध्यावधी निवडणुका 

उत्तर 

i) विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या (पाच वर्षे) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात.अशा निवडणुकांना 'मध्यावधी निवडणुका' असे म्हणतात.

ii) बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते. 

iii) काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते. परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते.

iv) अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा दयावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा वा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात.


2. आदिवासी चळवळ

उत्तर :

i) आदिवासी हा प्रारंभापासूनच जंगलसंपत्तीवर उदरनिर्वाह करणारा समाज आहे.

ii) ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगलसंपत्तीच्या अधिकारावरच गदा आणल्याने कोलाम, गोंड, संथाळ, मुंडा यांसारख्या आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केले होते.

iii) स्वतंत्र भारतातही आदिवासींचे उदरभरणाचे प्रश्न सुटलेले नाहीत. 

iv) वनजमिनींवरील त्यांचे हक्क, वनांतील उत्पादने गोळा करण्याचे व वनजमिनींवर लागवड करण्याचे त्यांचे हक्क मान्य केले जात नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी आदिवासींची आंदोलने अद्यापही चालू आहेत.


प्रश्न. 8. ब. दिलेल्या सुचनांनुसार कृती करा. 

1. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. 


उत्तर :



2. कामगार चळवळीची वाटचाल पुढील ओघतक्यात घटनाक्रमानुसार स्पष्ट करा. 


उत्तर :


प्रश्न. 9. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 

1. भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात कोणते बदल झाले आहेत. 

उत्तर :

भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात पुढील बदल झाले -

i) स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यांत काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता, 

ii) १९७७ साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले.

ii) १९८९ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकाच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकारावर आली,

iv) प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली.


2. मतदारांचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले. 

उत्तर :

भारतीय संविधानाने सर्व स्त्री-पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान २१ वर्षे पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा १८ वर्षे करण्यात आल्याने -

i) युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले. 

ii) आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला.

iii) यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वांत मोठी लोकशाही बनली.

iv) या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली. युवा वर्गाच्या राजकीय जाणिवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली.

Previous Post Next Post