इयत्ता दहावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका

इयत्ता दहावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका

इयत्ता दहावी भूगोल सराव प्रश्नपत्रिका

भूगोल सराव प्रश्नपत्रिका इयत्ता दहावी

भूगोल प्रश्नपत्रिका इयत्ता दहावी

भूगोल प्रश्नपत्रिका इयत्ता दहावी 2022

प्रश्न. 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 

1. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ................ या नावाने ओळखले जाते.

अ. लक्षद्वीप 

ब. कन्याकुमारी 

क. इंदिरा पॉईंट

ड. पोर्ट ब्लेअर

उत्तर :

भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट या नावाने ओळखले जाते.


2. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना ............. असे संबोधतात. 

अ. भूमध्य सागरी वने 

ब. जगाची फुफ्फुसे

क. जगाचा कॉपीपॉट

ड. रोका

उत्तर :

ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. 


3. भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था ................ या प्रकारची आहे. 

अ. अविकसित 

ब. अतिविकसित 

क. विकसनशील 

ड. विकसित 

उत्तर :

भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था विकसनशील या प्रकारची आहे. 


4. लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील ................ पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या. 

अ. दरशेकडा 

ब. प्रतिलाख 

क. दरहजारी 

ड. प्रतिदशलक्ष

उत्तर :

लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दरहजारी पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या. 


प्रश्न. 2. पुढील प्रश्नांची उत्तरे सुचनेप्रमाणे द्या. 

1. विधानांचा योग्य क्रम लावा - 

अ. क्षेत्रभेटीच्या ठिकाणाला 

ब. क्षेत्राची निवड 

क. अहवाललेखन 

ड. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी


i. ब , ड , अ , क 

ii. क , अ , ब , ड

iii. ड , अ , ब , क

iv. अ , ब , क , ड 

उत्तर :

i. ब , ड , अ , क 


2. वेगळा घटक ओळखा :

भारतीय वनस्पती :

i . देवदार 

ii. अंजन 

iii. ऑर्किड

iv. वड 

उत्तर :

iii. ऑर्किड


3. ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत :

i. निग्रो-ब्रांको-पारू 

ii. जरुका-झिंगू-अरगुआ

iii. पारू-परूस-झिंगू

iv. जापूरा-जारूआ-पुरूस

उत्तर :

ii. जरुका-झिंगू-अरगुआ


4. पुढीलपैकी कोणता आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो ?

उत्तर :

आकृती i) मधील आकार ब्राझीलचा किनारी भाग योग्य प्रकारे दर्शवतो. 


प्रश्न. 3. फरक स्पष्ट करा. 

1. गंगा नदीचे खोरे आणि ॲमेझाॅन नदीचे खोरे. 

उत्तर :

 गंगा नदीचे खोरे

 ॲमेझाॅन नदीचे खोरे

 

1. गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. 

2. गंगा नदीची एकूण लांबी २५२५ किमी आहे. 

3. गंगा नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद १६६४८ क्युसेक एवढा आहे. 

4. यमुना, चंबल, बेटवा, केन इत्यादी गंगा नदीच्या उपनद्या आहेत.   

 

1. ॲमेझाॅन नदी पेरू देशातील ॲडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर उगम पावते. 

2. ॲमेझाॅन नदीची एकूण लांबी ६४०० किमी आहे. 

3. ॲमेझाॅन नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 200000 क्युसेक एवढा आहे. 

4. निग्रो, जापुरा, झिंग इत्यादी ॲमेझाॅन नदीच्या उपनद्या आहेत.  



2. भारतातील नागरीकरण आणि ब्राझीलमधील नागरीकरण. 

उत्तर :

 भारतातील नागरीकरण

 ब्राझीलमधील नागरीकरण

 

1. भारतात तुलनेने कमी नागरीकरण झाल्याचे आढळते. 

2. २०११ च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण केवळ ३१.२ टक्के होते. 

3. भारतातील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याने आढळते. 

4. गोवा हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे.   

 

1. ब्राझीलमध्ये तुलनेने जास्त नागरीकरण झाल्याचे आढळते. 

2. २०११ च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण सुमारे ८४.६ टक्के होते. 

3. ब्राझीलमधील उत्तर भागात तुलनेने कमी व दक्षिणेकडील आणि आग्नेयेकडील भागात तुलनेने अधिक नागरीकरण झाल्याचे आढळते. 

4. सावो पावलो हे ब्राझीलमधील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे.   


3. भारतीय प्रमाणवेळ आणि ब्राझीलची प्रमाणवेळ

उत्तर :

 भारतीय प्रमाणवेळ

 ब्राझीलची प्रमाणवेळ

 

1. भारतीय प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. 

2. भारतीय प्रमाणवेळ ब्राझीलच्या प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे पुढे आहे. 

3. भारतामध्ये एकच प्रमाणवेळ मानली जाते. 

4. भारतातील अतिपश्चिमेकडील आणि अतिपूर्वेकडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १२० मिनिटांचा आहे. 

 

1. ब्राझीलची (अधिकृत) प्रमाणवेळ ही जागतिक प्रमाणवेळेच्या ३ तास मागे आहे. 

2. ब्राझीलची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेच्या ८ तास ३० मिनिटे मागे आहे. 

3. ब्राझीलमध्ये एकूण चार प्रमाणवेळा मानल्या जातात. 

4. ब्राझीलमधील अतिपश्चिमेकडील आणि पूर्वेकडील रेखावृत्तांतील वेळांतील फरक सुमारे १६८ मिनिटांचा आहे.   


प्रश्न. 4. अ. पुढे दिलेल्या ब्राझीलच्या नकाशा-आराखड्यात पुढील घटक दाखवा, नावे द्या व सूची तयार करा. 

1. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर

2. ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन प्रदेश 

3. ब्राझीलमधील महाकाय अँनाकोंडा आढळणारा प्रदेश

4. पंपास गवताळ प्रदेश 

5. ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे/ लहान राज्य 

6. ब्राझीलची राजधानी


उत्तर :


प्रश्न. 4. आ. पुढील भारताच्या नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

प्रश्न :

1. वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत ?

उत्तर :

वाहतूक सेवांचे रस्ते मार्ग आणि प्रमुख बंदरे ही प्रकार नकाशामध्ये दिसत आहेत. 


2. कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे ?

उत्तर :

भारताच्या दक्षिण भागात, विशेषत: तमिळनाडूमध्ये रस्ते मार्गाची घनता जास्त आहे. 


3. पूर्व किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा. 

उत्तर :

पूर्व किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे : कोलकाता, विशाखापट्टणम्, चेन्नई इत्यादी. 


4. श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग कोणता ?

उत्तर :

श्रीनगर व कन्याकुमारी या दोन शहरांना जोडणारा महामार्ग : उत्तर - दक्षिण महामार्ग 


5. भारताच्या कोणत्या भागात वाहतूक मार्गाने जाळे विरळ आहे ?

उत्तर :

पश्चिमघाट, ईशान्य भारत व उत्तरेकडील पर्वतमय प्रदेश या भागात वाहतूक मार्गाने जाळे विरळ आहे. 


प्रश्न. 5. भौगोलिक कारणे लिहा. 

1. भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. 

उत्तर :

i) भारत देश सुमारे दीड शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. 

ii) स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले. अनेक भागातील दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागले. अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. 

iii) विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणेमुळे भारतात आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारताची लोखसंख्या जास्त असून भारतात शेती-उद्योगधंद्याचा विकास झाला आहे. म्हणून भारत हा देश एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.        


2. ब्राझीलमध्ये उत्तरभाग घनदाट वनांनी व्यापला आहे. 

उत्तर :

i) ब्राझील देशाच्या उत्तर भागात ॲमेझाॅन नदीच्या खोऱ्यात वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २००० मिमी असते व या भागातील वार्षिक सरासरी सुमारे २८ से असते. 

ii) अशा प्रकारे, ब्राझील देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणपणे वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो. 

iii) या भागात वनस्पतींची वाढ झपाट्याणे होते व वनस्पतींचा जीवनकाळही मोठा असतो. त्यामुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. 


3. ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.

उत्तर :

i) ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ सर्वसाधारणपणे तापमानत फारसा फरक पडत नाही. 

ii) या प्रदेशात वाऱ्यांचे सातत्याने ऊध्र्व दिशेने वहन होते. 

iii) या प्रदेशातील आंतर उष्णकटिबंधीय एकत्रीकरण विभाग क्षीण स्वरूपाचा असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाहीत. त्यामुळे ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधिय वादळे कमी प्रमाणात होतात. 


4. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. 

उत्तर :

i) कोणत्याही देशाचा आर्थिक व सामाजिक विकास हा देशाची एकूण लोकसंख्या व लोकसंख्येची गुणवत्ता या घटकांवर अवलंबून असतो. 

ii) एखादया देशाची लोकसंख्या प्रमाणपेक्षा अधिक असेल व लोकसंख्येची गुणवत्ता निम्न असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास संथ गतीने होतो. 

iii) एखाद्या देशात लोकसंख्या पर्याप्त असेल व लोकसंख्येची गुणवत्ता उच्च असेल, तर अशा देशाचा आर्थिक व सामाजिक विकास जलद गतीचे होतो. अशा प्रकारे, लोकसंख्या ही एक महत्त्वाचे संसाधन आहे.   


प्रश्न. 6. अ. पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे बहुरेषालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा (%)

भारत व ब्राझील


 वर्ष 

भारत  

ब्राझील 

 १९७० 

०८   

१७   

१९८० 

१५  

२०  

 १९९० 

१८  

१५  

 २००० 

२८  

२४  

 २०१० 

५०  

२५  

 २०१६ 

४०  

२६  

प्रश्न : 

1. कोणत्या देशाचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे ?

उत्तर :

भारत देशाचा स्थूल अंतर्देशीय व्यापारातील हिस्सा जास्त आहे. 


2. 2016 मध्ये भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा किती हिस्सा होता ?

उत्तर :

2016 मध्ये भारताच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा 40% हिस्सा होता. 


3. 1980 मध्ये ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा किती आहे ?

उत्तर :

1980 मध्ये ब्राझीलच्या स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यापाराचा हिस्सा 20% आहे. 


प्रश्न. 6. आ. पुढील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

प्रश्न :

1. 1961 साली नागरीकरण किती टक्के झाले होते ?

उत्तर :

1961 साली नागरीकरण 18% झालेले होते. 


2. कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते ?

उत्तर :

1971 ते 1981 या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते. 


3. कोणत्या दशकात नागरीकारणाची वाढ अतिशय कमी होते ?

उत्तर :

1961 ते 1971 दशकात नागरीकारणाची वाढ अतिशय कमी होते. 


4. रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणत्या निष्कर्ष काढाल ?

उत्तर :

रेषालेखाचा कल पाहता 1971 च्या दशकानंतर भारतातील नागरीकरणामध्ये वाढ होत आहे. 


5. 1991 सालच्या नागरीकरणाची टक्केवारी किती आहे ?

उत्तर :

1991 सालच्या नागरीकरणाची टक्केवारी 25.7% एवढी होती. 


6. 1971 साली भारतात किती नागरीकरण झाले होते ?

उत्तर :

1971 साली भारतात 18.2% नागरीकरण झाले होते. 


प्रश्न. 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 

1. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल ? ते सांगून समुद्र किनारी गेल्यावर तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा. 

उत्तर :

अ) क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ :

i) माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बिण इत्यादी. 

ii) स्थानाच्या दिशा निश्चितीसाठी होकायंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे. 

iii) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली. 

iv) क्षेत्रातील पाण्याचे, मातीचे, कचऱ्याचे, वनस्पतींचे, दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे. याशिवाय टोपी, पाण्याची बाटली, प्रथमोपचार पेटी इत्यादी. 

ब) समुद्रकिनारी गेल्यावर पुढीलप्रमाणे काळजी घेऊ :

i) समुद्रकिनारी फिरावयाला गेल्यावर भरती, ओहोटीच्या वेळी जाणून घेऊ. 

ii) स्थानिक मार्गदर्शकाशिवाय, समुद्रकिनारे, पर्वतांचे कडे, वनप्रदेश, अपरिचित गुहा किंवा इतर स्थळाच्या ठिकाणी जाण्याचे टाळू. 

iii) समुद्रकिनाऱ्यावरील पर्वताच्या कड्यावर जंगली प्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा मोह टाळू. 

iv) समुद्राच्या खोल पाण्यात उतरण्याचा व पोहण्याचा मोह टाळू. 

v) पर्यटन स्थळे स्वच्छ ठेवू. 

vi) शिक्षक, स्थानिक मार्गदर्शक व सूचनाफलकावरील सुचनांचे तंतोतंत पालन करू. 


2. भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग कोणते ? ते सांगून द्वीपसमूहाविषयी संक्षिप्त माहिती लिहा. 

उत्तर :

अ) भारताचे प्रमुख पाच प्राकृतिक विभाग पुढीलप्रमाणे आहेत :

1) हिमालय,  2) उत्तर भारतीय मैदान, 

3) द्वीपकल्प, 4) किनारपट्टीचा प्रदेश आणि 

5) द्वीप समूह

ब) भारतातील द्वीप समूहाची माहिती पुढीलप्रमाणे आहे :

1) लक्षद्वीप बेटे : 

i) लक्षद्वीप बेटे हा अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहे. 

ii) ही बेटे भारताच्या नैर्ऋत्य (पश्चिम) किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात स्थित आहेत. 

iii) बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत. 

iv) लक्षद्वीप बेटे विस्ताराने लहान असून, त्यांची उंची तुलनेने कमी आहे. 

2) अंदमान आणि निकोबार बेटे :

i) अंदमान आणि निकोबार बेटे हा बंगालच्या उपसागरातील बेटांचा समूह आहे. ही बेटे भारताच्या आग्नेय (पूर्व) किनाऱ्यापासून खूप दूर, बंगालच्या उपसागरात स्थित आहेत. 

ii) अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहेत. 

iii) अंदमान बेटांच्या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातील काही बेटे कंकणद्वीपाच्या स्वरूपात आहेत. 

iv) अंदमान व निकोबार या बेटांच्या समूहातील ६°४५' अक्षावरील 'इंदिरा पॉइंट' ही भारताचे अतिदक्षिण टोक आहे.   


3. भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा. 

उत्तर :

भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे :

i) भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते. 

ii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते. 

iii) सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. 

iv) सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सोेम्य व समशीतोष्ण हवामान आढळते. 

Previous Post Next Post