इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 सराव प्रश्नपत्रिका 2022

इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 सराव प्रश्नपत्रिका 2022

इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 सराव प्रश्नपत्रिका 2022

इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 प्रश्नपत्रिका 2021

इयत्ता दहावी विज्ञान भाग 2 प्रश्नपत्रिका 2022

प्रश्न. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 

i. अर्धगुणसूत्री विभाजन भाग - I च्या पूर्वावस्थेतील .............. या अवस्थेमध्ये जनुकीय विचरण होते. 

अ. तनुसूत्रता 

ब. दृढसूत्रता 

क. स्थूलसूत्रता 

ड. मध्यसूत्रता

उत्तर :

क. स्थूलसूत्रता 


ii. .................. प्राण्यांच्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या  अळ्या सागरतळाशी स्थिरावल्यावर स्थानबद्ध प्रौढांमध्ये रूपांतरित होतात. 

अ. पुच्छसमपृष्ठरज्जू 

ब. अर्धसमपृष्ठरज्जू 

क. अपृष्ठवंशी 

ड. पृष्ठवंशी

उत्तर :

अ. पुच्छसमपृष्ठरज्जू 


iii. ............. जीवाणू हे सांडपाण्यातील मानवनिर्मित रसायनांचे विघटन करतात. 

अ. हायड्रोकार्बनोक्लास्टिक 

ब. विघटनकारी

क. ई-कोलाय

ड. फिनाॅल ऑक्सिडायझिंग

उत्तर :

ड. फिनाॅल ऑक्सिडायझिंग


iv. मुलपेशींच्या अंगी असलेल्या गुणधर्माला .............. असे म्हणतात. 

अ. विविधता

ब. समानता

क. विभेदनता

ड. बहुविधता

उत्तर :

ड. बहुविधता


v. विद्यार्थ्याना अध्ययनात एकाग्रता वाढवण्यासाठी .............. खूप उपयोग होतो. 

अ. खाऊचा 

ब. ध्यानधारणेचा 

क. छंदांचा

ड. खेळांचा

उत्तर :

ब. ध्यानधारणेचा 



प्रश्न. 1. ब. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

i.  


अ. वरील चित्रात कोणत्या प्रकारचे प्रदूषण दर्शवले आहे ?

उत्तर :

वरील चित्रात हवा प्रदूषण दर्शवले आहे. 


आ. त्यावरचा कोणताही एक उपाय लिहा. 

उत्तर :

C. N.G. इंधनावर चालणारी वाहने हवा सिडार बनवण्यासाठी केला जातो . 


ii. या प्राण्याचे नाव आणि त्याचा समावेश कोणत्या वर्गात होतो ते लिहा. 

उत्तर :

पेट्रोमायझाॅन, चक्रमुखी वर्ग


iii. सहसंबंध ओळखा :

तेलतवंग : अल्कॅनिव्होरॅक्स :  : कचऱ्यातील रबर : .................. 

उत्तर :

तेलतवंग : अल्कॅनिव्होरॅक्स :  : कचऱ्यातील रबर : अँक्टिनोमायसेटिस 


iv. नावे लिहा : गोडी देणारा पदार्थ आणि प्रथिन बांधणी करणारा इमाल्सिफायर पदार्थ. 

उत्तर :

 गोडी देणारा पदार्थ : झायलीटाॅल 

प्रथिन बांधणी करणारा इमाल्सिफायर पदार्थ : पॉलीसॅक्राईड्स


v. पुढील विधान चूक की बरोबर ते लिहा. 

सॅकरोमायसिस सेरेव्हिसी या जीवाणूचा वापर सिडार बनवण्यासाठी केला जातो. 

उत्तर :

बरोबर


प्रश्न. 2. अ. शास्त्रीय कारणे लिहा. 

i. लंगफिश हा मत्स्य आणि उभयचर या दोन वर्गांतील दुवा आहे. 

उत्तर :

i) लंगफिश हा मासा असून पाण्यात वास्तव्य करतो.  

ii) परंतु उभयचर प्राण्यांप्रमाणे त्याचे श्वसन फुप्फुसांद्वारे चालते. म्हणून लंगफिशला मत्स आणि उभयचर या वर्गातील जोडणारा दुवा म्हटले जाते.


ii. निदलपुंज आणि दलपुंज हे दोन्ही फुलांमधील अतिरिक्त मंडले आहेत.

उत्तर :

i) निदलपुंज आणि दलपुंज ही दोन्ही मंडले फुलांमधील आतील भागांचे संरक्षण करतात.  

ii) रंगीत दलपुंज परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करून घेतो.   

iii) परंतु ही दोन्ही मंडले प्रत्यक्ष प्रजननात भाग घेत नाहीत.  

iv) त्याचप्रमाणे युग्मके देखील तयार करीत नाहीत, म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असे म्हणतात.


iii. भूकंप ही विध्वंस करणारी नैसर्गिक आपत्ती आहे. 

उत्तर :

i) भूकंपामुळे घरे कोसळतात. पूल जमीनदोस्त होतात.  

ii) रस्ते उखडतात. दळणवळण संपुष्टात येते.   

iii) वीज पुरवठा खंडित होतो.   

iv) मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होते, म्हणून तिला विध्वांस करणारी नैसर्गिक आपत्ती असे म्हणतात.


प्रश्न. 2. ब. पुढील प्रश्न सोडवा. 

i. पुढील 'अ' आणि 'ब' या आकृत्या कोणत्या आहेत, ते ओळखून त्या प्रक्रियांमधील कोणतेही दोन फरकाचे मुद्दे लिहा. 

 द्विविभाजन

 बहुविभाजन

 1) एका सजीवापासून दोन सजीव निर्माण होतात. 

2) सुरुवातीसच पेशीद्रव्यांचे आणि केंद्रकाचे विभाजन होते. 

3) द्विविभाजनाचा अक्ष उभा, आडवा किंवा कोणत्याही अक्षात म्हणजेच साधा असतो. 

4) संरक्षक पुटी निर्माण होत नाही. 

5) द्विविभाजन अनुकूल परिस्थितीत केले जाते. 

 1) एका सजीवापासून एकाच वेळी अनेक नवे जीव निर्माण होतात. 

2) अगोदर विभाजन केवळ केंद्रकाचे होते. आधी पेशीद्रव्य विभाजित होत नाही. 

3) बहुविभाजनाचा नेमका अक्ष नसतो. 

4) बहुविभाजनाचा अगोदर सजीव संरक्षक पुटी निर्माण करतो. 

5) बहुविभाजन प्रतिकूल परिस्थितीत केले जाते.



ii. पुढील सजीव ओळखून त्याचा संघ कोणता ते लिहा. त्या संघाची कोणतीही दोन वैशिष्ट्ये लिहा :

उत्तर :

1) दिलेल्या प्राण्याचे नाव : शिंपला 

2) शिपल्याचा संघ : मोल्युस्का किंवा मृदुकाय. 

3) मृदुकाय संघाची वैशिष्ट्ये :

i) कॅल्शियम कार्बोनेटचे कवच शरीराचे रक्षण करते. 

ii) आंतरंग संहती प्रावार या पटलाने आच्छादित असते. 


iii. चीज निर्मिती यावर थोडक्यात टीप लिहा. 

उत्तर :

चीज निर्मिती :  

i) गाईच्या दुधाचे रासायनिक आणि सूक्ष्मजैविक परीक्षण करून त्यात तीन प्रकारचे सूक्ष्मजीव (लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस) व रंग मिसळले जातात.  

ii) तयार झालेल्या दह्यातील पाणी काढून, त्यात रेनेट किंवा प्रोटीएज हे विकर घातले जाते.  

iii) घट्ट झालेल्या दयाचे तुकडे कापून, रगडून ते धुतले जातात.   

iv) या मिश्रणात मीठ आणि रंग, स्वाद इत्यादी घालण्यात येतात. अशा रितीने बनलेले चीज परिपक्व बनवण्यासाठी साठवले जाते.


iv. पुढील तक्ता पूर्ण करा :

 देहगुहा 

जननस्तर  

संघ  

 नसते 

........................ 

 रंध्रीय प्राणीसंघ 


 नसते 

त्रिस्तर  

....................... 


 आभासी 

.......................... 

गोल कृमींचा संघ  


 असते 

.......................... 

 संधिपाद प्राणीसंघ 



उत्तर :

 देहगुहा 

जननस्तर  

संघ  

 नसते 

द्विस्तर 

 रंध्रीय प्राणीसंघ 


 नसते 

त्रिस्तर  

चपटे कृमी

 

 आभासी 

त्रिस्तर 

गोल कृमींचा संघ  


 असते 

त्रिस्तर 

 संधिपाद प्राणीसंघ 




v. गॅस सिलिंडर गळती या आपत्तीसंबंधी आपत्तीपूर्व आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन यांविषयी स्पष्टीकरण लिहा. 

उत्तर :

i) गॅस सिलिंडर गळतीसंबंधी आपत्तीपूर्व व्यवस्थापन :  

प्रथम घराच्या खिडक्या, दारे उघडू. गॅस एजन्सीमध्ये फोन करून त्यांच्या दुरुस्ती करणाऱ्या माणसाला लगेच पाचारण करू, घरात दिवे पेटवणार नाही. इलेक्ट्रिकल उपकरणे देखील बंद ठेवू.   

ii) गॅस सिलिंडर गळतीसंबंधी आपत्तीनंतरचे व्यवस्थापन :   

गॅस सिलिंडर गळतीने विषारी वायू पसरला गेला असेल, तर त्या घरातील व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांना त्वरित घराबाहेर काढून सुरक्षित जागी घेऊन जाऊ.


प्रश्न. 3. पुढील प्रश्न सोडवा. 

i. अ) हरित क्रांती म्हणजे काय ?

उतर :

कमी शेतजमिनीत जास्तीत जास्त धान्योत्पादन करण्याच्या पद्धतींना एकत्रितपणे हरित क्रांती म्हणतात. 


ब. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण ?

उत्तर :

डॉ. एम. एस. स्वामिनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत. 


क. AMUL या संक्षिप्त शब्दाचे पूर्ण रूप लिहा. AMUL चे मूळ संस्थापक कोण होते ?

उत्तर :

AMUL - म्हणजे Anand Milk Union Limited. त्याचे संस्थापक डॉ. वर्गीस कुरियन होते. 


ii. 

वरील आकृतीचे निरीक्षण करा. नामनिर्दिशन केलेले भाग ओळखून प्रत्येकाचे कार्य लिहा. 

उत्तर :

अ : पुमंगातील वृत्त - वृत्त परागकोशाला आधार देतात.

ब : निदलपुंज - फुलाच्या आतील दलांना कळीच्या अवस्थेत असताना संरक्षण देणे.

क : दलपुंज (पाकळ्या) - परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करणे.

ड : अंडाशय – स्त्री युग्मके-बीजांड यांची निर्मिती करणे.

इ : कुक्षिवृंत - अंडाशय आणि कुक्षी यांना जोडते.

फ: कुक्षी - परागीभवनाच्या वेळी परागकण पडून रुजण्यासाठी जागा देणे.


iii. 

अ. वरील आकृती कोणती अभिक्रिया दर्शवते ?

उत्तर :

वरील आकृतीत केंद्रीय खंडन ही प्रक्रिया दाखवली आहे.


ब. या अभिक्रियेला वापर कुठे केला जातो ?

उत्तर :

वरील प्रक्रिया अणू ऊर्जा केंद्रात वापरली जाते व त्यापासून विदयुत ऊर्जा निर्माण केली जाते.


क. कोणते मूलद्रव्य वापरुन ही प्रक्रिया घडवून आणली जाते ?

उत्तर :

युरेनियम-235 हे मूलद्रव्य या प्रक्रियेत वापरले जाते.


iv. पुढे दिलेली चिन्हे ओळखा. त्या चिन्हांचा पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात अर्थ काय आहे ?

उत्तर :

अ) या चिन्हाचा संदेश असा आहे की, आपला कचरा व्यवस्थित हाताळा. इकडे-तिकडे कचरा फेकू नका. कचरा ही संपत्ती ठरू शकते. आपण त्याचे व्यवस्थापन नीट आणि जबाबदारीपूर्वक करावे.

ब) 'विजेचा वापर काटकसरीने करा, त्यामुळे नैसर्गिक साधनसंपदा वाचवू शकाल' अशा आशयाचा मथितार्थ या चिन्हातून दिसतो.

क) हरित ऊर्जेचा वापर करा. सायकल वापरा. इंधन वाचवा. अशा आशयाचा संदेश हे चिन्ह देते.


v. सौर ऊर्जेचे फायदे आणि मर्यादा काय आहेत ?

उत्तर :

I) फायदे :  

i) सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नाही.   

ii) त्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. ज्या प्रदेशात मुबलक सूर्यप्रकाश आहे, तेथे हे तंत्रज्ञान सहज वापरता येते.   

iii) सौर ऊर्जा ही हरित अतिशय फायदेशीर आहे.   

II) मर्यादा :  

i) सौर ऊर्जेची मर्यादा म्हणजे सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिससाच विद्युतनिर्मिती करू शकतात.   

ii) तसेच पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात या तंत्राची परिणामकारकता कमी होते.   

iii) सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती दिष्ट (DC) असते, तर घरातील बहुतेक उपकरणे प्रत्यावर्ती (AC) असतात.   


vi. जैवविविधतेचे प्रकार सांगून, त्याची उदाहरणे लिहा. 

उत्तर :

जैवविविधता तीन पातळ्यांवर दिसते. या पातळ्या पुढीलप्रमाणे आहेत :

आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्था विविधता.   

i) आनुवंशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. प्रत्येक प्राणी किंवा माणूस एकसमान नसतो. थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते.   

ii) प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो.   

iii) परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशांतून दिसून येणाऱ्या परिसंस्था होय. प्रत्येक प्रदेशातल्या अनेक परिसंसस्थांत प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. एखादया प्रदेशातील सजीव आणि त्याचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधांतून परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील दोन स्वतंत्र परिसंस्था असतात.    


vii. आकृती पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 

अ. पुढील घनकचरा व्यवस्थानाच्या पद्धतीचे नाव लिहा. 

उत्तर :

आधुनिक भूमिभरण स्थळ हे या घनकचरा व्यवस्थापनाच्या पद्धतीचे नाव आहे.


ब. या पद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचा कचरा वापरला जातो ?

उत्तर :

या पद्धतीत शहरातील गोळा होणारा विघटनशील कचरा गोळा केला जातो. तो या ठिकाणी विघटित करण्यात येतो.


क. अशा पद्धतीमधून कोणते उपयुक्त पदार्थ मिळवता येतात ?

उत्तर :

सेंद्रिय खते आणि मिथेन वायूसारखे इंघन हे उपयुक्त पदार्थ या पद्धतीने हे मिळवता येतात.


viii. (क्रो मॅग्नन, मेंदू, बुद्धिमान मानव, अग्नीच्या, निॲन्डरथॉल मानव, पाण्याच्या)

जवळजवळ एक लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा .............. मोठा होण्याच्या दिशेने त्याची .............. होतच राहिली आणि त्याला .............. वापराचा शोध लागला. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि .............. (होमो सॅपियन) या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. .............. हे 'बुद्धिमान मानव' या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी .............. मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली.

उत्तर :

जवळ जवळ एक लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराच शोध लागला. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव (होमो-सॅपियन) या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. 'निॲन्डरथॉल मानव' हे 'बुद्धिमान मानव' य' वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी को मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली.

प्रश्न. 4. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : (कोणताही एक) 

अ.  कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया दर्शवणारे संकल्पना चित्र काढा.

उत्तर :


ब.  दिलेला परिच्छेद वाचून, त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : 

आपत्तीचे तीन प्रमुख प्रकार पाडण्यात येतात. ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती, तंत्रज्ञानाच्या चुकीच्या उपयोगामुळे निर्माण होणाऱ्या आपत्ती आणि हेतुपूर्वक कारणांनी मानवांनीच निर्माण केलेल्या संकटांची मालिका ! नैसर्गिक आपत्तीवर आपल्याला काहीच नियंत्रण ठेवता येत नाही. त्यातच सध्याच्या हवामानबदलाच्या पर्वात अशा आपत्तींची वारंवारता खूप जास्त प्रमाणात वाढली आहे. सतत येत असलेली चक्रीवादळे, महापूर, ढगफुटी अशा संकटांनी जगभरात मानवाला जेरीस आणले आहे. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या आणि बेपर्वाईच्या वागण्यामुळे मोठ्या प्रमाणात आपत्ती येऊ शकतात. मानवनिर्मित आपत्ती मात्र धर्म, प्रदेश, राजकारण अशा विविध कारणांतून तयार करण्यात येतात. दंगे घोपे, अतिरेकी कारवाया अशा आपत्ती खरे तर सहज टाळता येतील.

प्रश्न :

1) आपत्तीचे तीन प्रमुख प्रकार कोणते ?

उत्तर :

नैसर्गिक आपत्ती, तंत्रज्ञानाच्या अयोग्य वापराने निर्माण झालेल्या आपत्ती आणि मानवनिर्मित हेतुपूर्वक केलेल्या आपत्ती असे आपत्तीचे तीन प्रमुख प्रकार आहेत.

2) कोणत्या आपत्ती नियंत्रणाखाली आणता येत नाहीत ? का ?

उत्तर :

नैसर्गिक आपत्ती नियंत्रणाखाली आणता येत नाहीत; कारण त्या उद्भवल्या की त्यांना थोपवणे मानवी शक्तीच्या बाहेरचे काम असते. 

3) हल्लीच कोणत्या मोठ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशातील स्थानिक लोकांना करावा लागला ?

उत्तर :

ढगफुटी आणि त्यामुळे आलेले महापूर व भूस्खलन या नैसर्गिक आपत्तीचा सामना पश्चिम महाराष्ट्रातील स्थानिक लोकांना करावा लागला.

4) तंत्रज्ञानाच्या बिघाडाने संपूर्ण भारताला हादरवणारी अशी कोणती आपत्ती झाली होती ?

उत्तर :

1984 साली झालेली 'भोपाळ वायू दुर्घटना' ही तंत्रज्ञानाच्या बिघाडाने संपूर्ण भारताला हादरवणारी अशी आपत्ती झाली होती.

5) कोणत्या प्रकारच्या आपत्तींवर नियंत्रण ठेवल्यामुळे आपल्याला आनं शांततापूर्ण आणि सुरक्षित आयुष्य मिळू शकते ?

उत्तर :

आपण मानवनिर्मित हेतुपूर्वक केल्या जाणाऱ्या दंगल, अतिरेकी कारवाया अशा कृत्यांवर सामोपचाराने, चर्चेने उपाय काढले आणि नियंत्रण ठेवले, तर आपले आयुष्य आनंदी, शांततापूर्ण आणि सुरक्षित होऊ शकते.

Previous Post Next Post