इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका 2021

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका 2021

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 प्रश्नपत्रिका 2022

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 प्रश्नपत्रिका 2021

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 प्रश्नपत्रिका सराव

विज्ञान भाग 1 इयत्ता दहावी सराव प्रश्नपत्रिका 2021 

इयत्ता दहावी विज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका 2021

प्र. 1. अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा. 

i) जेव्हा शुभ्र प्रकाशाचे काचेच्या लोलकाद्वारे सात रंगांत अपस्करण होते, तेव्हा .............. रंगाचे विचलन सर्वात कमी असते. 

अ. पिवळ्या 

आ. नारिंगी 

क. तांबड्या 

ड. निळ्या

उत्तर : 

क. तांबड्या 


ii. विद्युतशक्ती = .................

अ. V2R

ब. I2R

क. I2V

ड. R2I

उत्तर :

ब. I2R


iii. आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत ?

अ. s-खंड 

ब. p-खंड 

क. d-खंड

ड. f-खंड

उत्तर :

ब. p-खंड 


iv. समजा, पृथ्वीची त्रिज्या आहे त्यापेक्षा अर्धी झाली पण वस्तुमान तेच राहिले, तर वस्तूचे पृथ्वीवरील वजन आधीच्या .............. होईल. 

अ. दुप्पट 

ब. अर्धे

क. एक-चतुर्थाश

ड. चारपट

उत्तर :

ड. चारपट


v. ............... हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. 

अ. तांबे

ब. जस्त 

क. अँल्युमिनिअम 

ड. सिल्व्हर 

उत्तर :

ब. जस्त 



प्रश्न. 1. ब. पुढील प्रश्न सोडवा :

i. चूक की बरोबर ते लिहा : ओरस्टेड हे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता या भौतिक राशीचे एकक आहे. 

उत्तर :

बरोबर


ii. नाव लिहा : असे भिंग ज्यामुळे वस्तूच्या स्थानानुसार वास्तव प्रतिमा अथवा आभासी प्रतिमा तयार होते. 

उत्तर :

बहिर्गोल भिंग


iii. वेगळा घटक ओळखा :

मीथेन, ईथेन, प्रोपीन, प्रोपेन, ब्यूटेन. 

उत्तर :

प्रोपीन


iv. सहसंबंध पूर्ण करा :

भिंगाचे नाभीय अंतर : मीटर : भिंगाची शक्ती : ...............

उत्तर :

भिंगाचे नाभीय अंतर : मीटर : भिंगाची शक्ती : डायाॅप्टर


v. जोडी जुळवा :

 स्तंभ 'अ' 

 स्तंभ 'ब' 

 गुरुत्व त्वरण 

1. जडत्वाचे माप 

2. संपूर्ण वीश्वत सारखे 

3. पृथ्वीच्या केंद्राजवळ शून्य  


उत्तर :

गुरुत्व त्वरण : पृथ्वीच्या केंद्राजवळ शून्य


प्रश्न. 2. अ. शास्त्रीय कारणे लिहा. 

i. एखाद्या वस्तूचा चंद्रावरील मुक्तिवेग त्या वस्तूच्या पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी असतो. 


ii. हिवाळ्यात कधी कधी रात्री दव पडते. 

उत्तर :

 i) हिवाळ्यात रात्रीच्या वेळी हवेचे तापमान दवबिंदू तापमानइतके कमी किंवा त्याहूनही कमी होऊ शकते. 

ii) तापमान दवबिंदू तापमानापेक्षा खाली गेल्यास हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संघनन होते आणि ती थंड पृष्ठभागावर जमा होते. थंड पृष्ठभागावर जमा झालेले हे पाणी म्हणजेच दव होय. 


iii. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो. 

उत्तर :

एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते. पण केंद्रकावरील धन प्रभार वाढत जातो. (कारण इलेक्ट्रॉनची संख्या एक एक ने वाढत जाते). त्यामुळे केंद्र व इलेक्ट्रॉन यातील आकर्षण बल वाढून अणूत्रिज्या कमी होते. त्यामुळे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉन गमावणे अणूला कठीण होत जाते. अर्थात इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो.  



प्रश्न. 2. ब. पुढील प्रश्न सोडवा. 

i. एका पदार्थाचा हवासापेक्ष अपवर्तनांक 1.25 आहे; तर प्रकाशाचा त्या माध्यमातील वेग काढा. (प्रकाशाचा हवेतील वेग = 3 x 10m/s) 

ii. संज्ञा उदाहरणांसहित स्पष्ट करा : संयोग अभिक्रिया 

जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात. 

मॅग्नेशिअम (Mg) धातूची फीत जाळली असता, हवेतील ऑक्सिजनबरोबर संयोग होऊन मॅग्नेशिअम ऑक्साइडची (MgO) ची पांढरी भुकटी हे एकमेव उत्पादित तयार होते. 

2Mg(s) + O2(s)  → /उष्णता  2MgO(s)


iii. टीप लिहा : चुंबकीय विलगीकरण पद्धत 

उत्तर :

1) विद्युत चुंबकत्व असलेल्या या यंत्रात दोन प्रकारचे लोखंडी रूळ (Roller) व त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा (Conveyer belt) असतो. यांपैकी एक अचुंबकीय असतो, तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो. रुळांवरून या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातुक टाकले जाते. चुंबकीय रुळाखाली दोन संग्राहक भांडी असतात.

2) धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जात नसल्याने ते फिरत असलेल्या पटट्यावरून वाहत वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात पडतात. त्याच वेळी धातुकातील चुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळावर चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात.

3) अशा प्रकारे धातुकामधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यामधील चुंबकत्वामुळे वेगवेगळे करता येतात. उदाहरणार्थ, कॅसिटराइट हे कथिल या धातूचे धातुक आहे. या धातुकात मुख्यत्वे स्टॅनिक ऑक्साइड (SnO2) हा अचुंबकीय घटक आणि फेरस टंगस्टेट (FeWO4) हा चुंबकीय घटक असतो. कॅसिटराइट या धातुकाचे विद्युत-चुंबकीय पद्धतीने विलगीकरण केले जाते.


iv. अंतर्गोल भिंगाचे तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे नियम लिहा. 

उत्तर :

अंतर्गोल भिंगाचे तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे नियम :

i) जर आपाती किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास भिंगाच्या मुख्य नाभीतून जातो. 

ii) जर आपाती किरण भिंगाच्या मुख्य नाभीतून (नाभी Fच्या दिशेने) जात असेल तर अपवर्तित किरण भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर जातो. 

iii) जर आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल, तर त्याची दिशा बदलत नाही.  


v. सुबक, नामनिर्देशित आकृती काढा : काचेच्या त्रिकोणी लोलकामुळे होणारे सूर्यप्रकाशाचे (शुभ्र प्रकाशाचे) अपस्करण. 

उत्तर :



प्रश्न 3. पुढील उपप्रश्न सोडवा.  (कोणतेही पाच) 

i. पुढील तक्ता पूर्ण करा. 



उत्तर :


ii. समजातीय श्रेणी म्हणजे काय ? अल्केन गटातील समजातीय श्रेणीची पहिली चार उदाहरणे द्या. 

उत्तर :

समजातीय श्रेणी : कार्बनी संयुगामध्ये कार्बन शृंखलेची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असल्याने त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये खूप साधर्म्य असते. क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलावर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते, अशा श्रेणीला समजातीय श्रेणी म्हणतात. लगतच्या दोन संयुगांमध्ये (वरच्या व खालच्या) एक -CH2- गटाचा फरक असतो. 

अल्केन गटातील समजातीय श्रेणीची पहिली चार उदाहरणे :

1) मीथेन  CH4

2) ईथेन C2H6

3) प्रोपेन C3H8

4) ब्यूटेन C4H10


iii. पुढील कृती अभ्यासा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 

1. समान वस्तुमान असलेले लोखंड, तांबे व शिसे यांचे भरीव गोल घ्या. 

2. तीनही गोल काही काळ उकळत्या पाण्यात ठेवा. 

3. काही वेळानंतर त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढा त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर ठेवा. 

4. प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत गेला ? नोंद करा. 

प्रश्न : i) या कृतीतून पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येईल ?

उत्तर :

विशिष्ट उष्माधारकता


ii) तो गुणधर्म कमीत कमी शब्दांत सांगा. 

उतरत :

विशिष्ट उष्माधारकता : एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1° ने वाढवण्यासाठी लागणारीउष्णता. 


iii) याच कृतीच्या आधारे उष्णता विनिमयाचे तत्त्व स्पष्ट करा. 

उत्तर : 

उष्णता विनिमयाच्या तत्त्वानुसार उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. या कृतीमध्ये लोखंडी गोळ्याने ग्रहण केलेली उष्णता जास्त प्रमाणात मेणाला दिली जाते त्यामुळे तों खोल जातो, तर शिश्याचा  गोळा उष्णता ग्रहण करतो. परिणामी तो कमी उष्णता मेणाला देतो म्हणून तो कमी खोल जातो. 


iv. दूरदृष्टिता ट त्याचे निराकरण स्पष्ट करणाऱ्या सुबक, नामनिर्देशित आकृत्या काढा. 

उत्तर :



v. एक वर फेकलेली वस्तू 20 m उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल ? त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल ?

(g = 10 m/s2)


vi. मेंडेलीव्हचा आवर्तसारणीचे गुण विशद करा. 

उत्तर :

i) आवर्तसारणीत गुणधर्माप्रमाणे योग्य स्थान देता यावे, म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदा., बेरिलिअमचे यापूर्वीचे 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त करण्यात आले व बेरिलिअमला बोराॅनच्या आधीची जागा दिली. 

ii ) आवर्तसारणीमध्ये मेंडेलीव्हचे शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या. त्यांपैकी तीन अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात  मूलद्रव्यांवरून इका-बोरॉन, इका-अँल्युमिनिअम व इका-सिलिकॉन अशी नावे दिली. मेंडेलीव्हने त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील अशी दर्शवली. त्याप्रमाणे त्यांच्या गुणधर्माचेही भाकीत केले. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कॅडिअम (Sc), गॅलिअम (Ga) व जर्मेनिअम (Ge) अशी नावे देण्यात आली. या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलीव्हच्या भाकीतांशी जुळणारे आढळले. यामुळे मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीचे महत्त्व पटले. 

उदा., इका बोरॉन - स्कॅडिअम 

इका अँल्युमिनिअम - गॅलिअम

इका सिलिकॉन - जर्मेनिअम

iii) मेंडेलीव्हच्या मूळ आवर्तसारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवली नव्हती. जेव्हा हेलिअम, निऑन, अरगॉन इत्यादी निष्क्रिय वायूंचा शोध लागला तेव्हा मेंडेलीव्हने मूळ आवर्तसारणीला धक्का न लावता शून्य गण निर्माण केला व त्यात निष्क्रिय वायू ( राजवायू ) ठेवण्यात आले.        


vii. अँल्युमिनिअमच्या निष्कर्षणात :

1) बॉक्साइटचे संहतीकरण करण्याच्या पद्धतीचे नाव लिहा. 

उत्तर :

बॉक्साइटचे संहतीकरण करण्याच्या पद्धतीचे नाव : बेअरची पद्धती किंवा हॉलची पद्धती. 


2) अँल्युमिनाचे विद्युत अपघटनी क्षपण होताना कॅथोडवरील अभिक्रिया लिहा. 

उत्तर :

कॅथोडवरील अभिक्रिया : Al3 + 3e-  Al


3) क्रायोलाइटचे कार्य आणि रासायनिक सूत्र लिहा. 

उत्तर :

क्रायोलाइटचे रासायनिक सूत्र : Na3AlF6 किंवा AlF3,3NaF. अँल्युमिनाचा द्रवणांक 1000° पर्यंत कमी करण्यासाठी मिश्रणात क्रायोलाइट मिसळले जाते. 


viii. पुढील तक्ता पूर्ण करा :

 सामान्य नाव 

 रचनासूत्र

 आय. यू. पी. ए. सी. नाव

 1) अँसिटिलीन 


HC ≡ CH

 .................

 2) ................


 CH3-CHO

 ईथेनाल

 3) एथिल अमीन  

 .................

ईथनामीन 


उत्तर :

 सामान्य नाव 

 रचनासूत्र

 आय. यू. पी. ए. सी. नाव

 1) अँसिटिलीन 


HC ≡ CH

 ईथाइन

 2) अँसिटाल्डिहाइड


 CH3-CHO

 ईथेनाल

 3) एथिल अमीन  


 CH3-CH2-NH2

ईथनामीन 


प्रश्न. 4. पुढील प्रश्न सोडवा (कोणताही एक)

i. रचना व कार्य सांगा. व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे दया : प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र.

उत्तर :

i) आकृतीमध्ये प्रत्यावर्ती विदयुतधारा जनित्राची (AC जनरेटरची) रचना दाखवली आहे.

यात ABCD हे आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल शक्तिशाली चुंबकाच्या दोन (Nव S) ध्रुवांमध्ये ठेवलेले असते.

कुंडलाची दोन टोके R1 व R2 या दोन विदयुतवाहक कड्यांना B1 व B2 या कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही कडी आसाला (अक्षाला) धरून बसलेली असतात, पण कडी व आस यांमध्ये विदयुतरोधी आवरण असते. B1 व B2 यांची टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात. गॅल्व्हॅनोमीटर (G) परिपथातील विदयुतधारेची दिशा दाखवतो. 

कार्य : आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा ABCD हे कुंडल शक्तिशाली चुंबकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रातून फिरते, तेव्हा ते चुंबकीय बलरेषांना छेदते. अशा प्रकारे बदलत जाणारे चुंबकीय क्षेत्र कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित करते. या प्रवर्तित विदयुतधारेची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ठरवली जाते. AD या बाजूने पाहिल्यास कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरते. एका अर्ध्या फेरीत AB ही बाजू वर जाते व CD ही बाजू खाली जाते. या वेळी विदयुतधारेची दिशा A →  C → D अशी असते व बाह्य परिपथात विद्युतधारा` B2 → G → B1 अशी वाहते. अर्ध्या परिवलनानंतर CD ही बाजू AB या बाजूची जागा घेते व AB ही बाजू CD या बाजूची जागा घेते. या वेळी विद्युतधारा D → C → B → A अशी वाहते. पण CD ही बाजू ब्रश B2 च्या  संपर्कात व AB ही बाजू ब्रश B1 च्या संपर्कात असल्याने बाह्य परिपथात विद्युतधारा B1 → G → B2 अशी वाहते. 

ही क्रिया नियमितपणे पुनःपुन्हा घडते. अशा प्रकारे ही प्रवर्तित विद्युतधारा प्रत्यावर्ती स्वरूपाची असल्याने तिला प्रत्यावर्ती विद्युतधारा (AC) म्हणतात.


ii. ऑक्सिजन हा विषम अणू असलेले कोणतेही पाच क्रियात्मक गट सांगून प्रत्येकी एका उदाहरणाचे नाव व रचनासूत्र लिहा.

उत्तर :

 विषम अणू

 नाव

 रचनासूत्र

 उदाहरण

 नाव

 ऑक्सिजन 

 1) अल्कोहोल

 -OH 


 CH3-OH

 मीथेनॉल

 

 2) अल्डिहाइड

 -CHO


 

 अँसिटाल्डिहाइड

 

 3) कीटोन


 



 अँसीटोन 

 

 4) कार्बोक्सिलिक आम्ल 


 


 

अँसेटिक आम्ल 

 

 5) ईथर 


 -O-

 

 डाय मिथाइल ईथर 


Previous Post Next Post