टीपा लिहा चुंबकीय विलगीकरण पद्धत

टीपा लिहा चुंबकीय विलगीकरण पद्धत

टीप लिहा चुंबकीय विलगीकरण पद्धत 

टीपा लिहा चुंबकीय विलगीकरण पद्धत

उत्तर :

1) विद्युत चुंबकत्व असलेल्या या यंत्रात दोन प्रकारचे लोखंडी रूळ (Roller) व त्यांच्यावरून सतत गोल फिरणारा पट्टा (Conveyer belt) असतो. यांपैकी एक अचुंबकीय असतो, तर दुसरा विद्युत चुंबकीय असतो. रुळांवरून या फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रुळाच्या बाजूला बारीक केलेले धातुक टाकले जाते. चुंबकीय रुळाखाली दोन संग्राहक भांडी असतात.

2) धातुकामधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षिले जात नसल्याने ते फिरत असलेल्या पटट्यावरून वाहत वाहत पुढे जातात आणि चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात पडतात. त्याच वेळी धातुकातील चुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळावर चिकटून असल्यामुळे पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात.

3) अशा प्रकारे धातुकामधील चुंबकीय आणि अचुंबकीय कण त्यामधील चुंबकत्वामुळे वेगवेगळे करता येतात. उदाहरणार्थ, कॅसिटराइट हे कथिल या धातूचे धातुक आहे. या धातुकात मुख्यत्वे स्टॅनिक ऑक्साइड (SnO2) हा अचुंबकीय घटक आणि फेरस टंगस्टेट (FeWO4) हा चुंबकीय घटक असतो. कॅसिटराइट या धातुकाचे विद्युत-चुंबकीय पद्धतीने विलगीकरण केले जाते.

Previous Post Next Post