रचना व कार्य सांगा व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे दया : प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र

रचना व कार्य सांगा व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे दया : प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र

रचना व कार्य सांगा व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे दया : प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र

उत्तर :

i) आकृतीमध्ये प्रत्यावर्ती विदयुतधारा जनित्राची (AC जनरेटरची) रचना दाखवली आहे.

यात ABCD हे आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल शक्तिशाली चुंबकाच्या दोन (Nव S) ध्रुवांमध्ये ठेवलेले असते.



कुंडलाची दोन टोके R1 व R2 या दोन विदयुतवाहक कड्यांना B1 व B2 या कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही कडी आसाला (अक्षाला) धरून बसलेली असतात, पण कडी व आस यांमध्ये विदयुतरोधी आवरण असते. B1 व B2 यांची टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात. गॅल्व्हॅनोमीटर (G) परिपथातील विदयुतधारेची दिशा दाखवतो. 

कार्य : आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. जेव्हा ABCD हे कुंडल शक्तिशाली चुंबकाने निर्माण केलेल्या चुंबकीय क्षेत्रातून फिरते, तेव्हा ते चुंबकीय बलरेषांना छेदते. अशा प्रकारे बदलत जाणारे चुंबकीय क्षेत्र कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित करते. या प्रवर्तित विदयुतधारेची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे ठरवली जाते. AD या बाजूने पाहिल्यास कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरते. एका अर्ध्या फेरीत AB ही बाजू वर जाते व CD ही बाजू खाली जाते. या वेळी विदयुतधारेची दिशा A →  C → D अशी असते व बाह्य परिपथात विद्युतधारा` B2 → G → B1 अशी वाहते. अर्ध्या परिवलनानंतर CD ही बाजू AB या बाजूची जागा घेते व AB ही बाजू CD या बाजूची जागा घेते. या वेळी विद्युतधारा D → C → B → A अशी वाहते. पण CD ही बाजू ब्रश B2 च्या  संपर्कात व AB ही बाजू ब्रश B1 च्या संपर्कात असल्याने बाह्य परिपथात विद्युतधारा B1 → G → B2 अशी वाहते. 

ही क्रिया नियमितपणे पुनःपुन्हा घडते. अशा प्रकारे ही प्रवर्तित विद्युतधारा प्रत्यावर्ती स्वरूपाची असल्याने तिला प्रत्यावर्ती विद्युतधारा (AC) म्हणतात.

Previous Post Next Post