हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा

हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा

प्रश्न 

हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व अधोरेखित करणारी उदाहरणे स्पष्टीकरणासह तुमच्या शब्दात लिहा

 उत्तर 

हवामानाचे सजीवसृष्टीतील असणारे महत्त्व -

i) दैनंदिन तसेच दीर्घकालीन हवेचा व हवामानाचा मानवी जीवनपद्धतीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. 

ii) एखादया प्रदेशातील लोकांचा आहार, पोशाख, घरे, व्यवसाय व जीवनाची पद्धती निवडण्यास त्या प्रदेशातील हवामान साहाय्यभूत ठरते. उदा. काश्मीर मधील लोकांचे राहणीमान हे तेथील हवामानानुसार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे हवामान थंड असल्यामुळे त्यांचे खानपान त्याला अनुसरून असते. 

iii) भूपृष्ठाच्या आच्छादनातील खडक विदारणाचे कार्य हवामानातील विविध घटक करीत असतात. जसे भूपृष्ठांवरील खडाकांचे हवामानाचा परिणाम होऊन ते फुटतात व त्यांचा भुगा होतो. म्हणजेच खडकांतील कणांचे विलगीकरण होते. 

iv) मातीच्या निर्मितीत आणि विकासात हवामानाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उदा. शीत कटिबंधात खडकांची विविधता असूनही टुंड्रा मृदा तयार झालेली आढळते. 

v) सागरजलाची क्षारता, सागरप्रवाहांची  निर्मिती व जलचक्राची निर्मिती या सर्व बाबी हवा व हवामानाच्या विविध घटकांशीच संबंधित आहेत.

Previous Post Next Post