खडू - फळा (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता

खडू - फळा (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता

 

 सविस्तर उत्तरे लिहा

प्रश्न

 

खडू - फळा (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत कोणत्या उपक्रमांचा समावेश होता


उत्तर

 

'खडू - फळा' (ऑपरेशन ब्लॅक बोर्ड) या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होता. 

i) प्राथमिक शाळेत मुलांची १००% उपस्थिती : प्राथमिक शाळेत जास्तीत जास्त मुलांची उपस्थिती १००% टक्के असणे आवश्यक आहे. त्यामुळे समाजातील मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढेल. सर्व शिक्षित होईल.

ii) विद्यार्थी गळती रोखने : प्राथमिक म्हणजे १ ली ते ५ वी गळतीचे प्रमाण जे ४६% आहे. व ५ वी ते १० पर्यंतचे गळतीचे प्रमाण ६०% पर्यंत आहे. ते अनुक्रमे २०% आणि ४०% घटविण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे सर्व शिक्षित होईल.

iii) मुलींचे शिक्षण : या योजनेअंतर्गत ज्या मुली सामाजिक व आर्थिक कारणाने शाळेत येवू शकत नाहीत त्यांना अनौपचारिक शिक्षणातून शिक्षण प्रवाहात आणणे हा उद्देश आहे.

iv) दिव्यांगासाठी शिक्षण : दिव्यांगासाठी प्राथमिक शिक्षण आवश्यक असल्याने या योजनेअंतर्गत त्यासाठी शिक्षणाची सोय केली आहे.

v) प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन : प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन करून अभ्यासक्रमात पुनर्रचना करण्यात आली आहे. पाठाचा बोजा अभ्यासक्रमातून घटविण्यात आला असून पाठांतरावरील भर कमी केला आहे.

vi) पर्यायी शिक्षण : या योजनेत प्राथमिक शिक्षणासोबतच व्यावसायिक शिक्षणाचीही सोय केली आहे. व्यावसायिक शिक्षणाची गरज अभ्यासासाठी त्या जिल्ह्याचे सर्वेक्षण करण्यात येते. आणि त्याआधारे मनुष्यबळाची गरज पाहून हे अभ्यासक्रम दिले जातात.

vii) समाजजागृती : शिक्षणामुळे समाजजागृती घडून येते. प्रत्येक व्यक्ती शिक्षित झाला तर अंधश्रद्धा, अनिष्ठ चालीरीती, रूढी, परंपरा नष्ट होईल. समाज शिक्षित झाला तर समाजाची प्रगती होईल. देशाचा विकास होईल. या योजनेअंतर्गत समाजजागृती घडविण्याचाही उपक्रम राबविला आहे.



Previous Post Next Post