अभिरुप सराव उपयुक्त असतो
उत्तर :
i) अभिरुप सराव हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे एक प्रभावी साधन आहे.
ii) कोणतीही आपत्ती ही सांगून येत नाही. कधीही, कोणत्याही क्षणी येऊ शकते. अशावेळेस व्यक्ती सजग असणे फार आवश्यक आहे.
iii) अभिरुप सरावामुळे कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन करण्यात येते.
iv) त्यावेळी आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते की नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्यांना देण्यात आलेल्या कृती पार पडतात यावरून आपण निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहता येते. म्हणून अभिरुप सराव उपयुक्त असतो.
Tags:
अभिरुप_सराव_उपयुक्त_असतो