टिपा लिहा अभिरूप सराव
उत्तर :
i) अभिरूप सराव हे आपत्ती ओढवल्याच्या परिस्थितीमध्ये तत्परतेची तात्काळ आणि कमीत कमी वेळेत तयारीची स्थिती मोजण्याचे एक साधन आहे.
ii) कोणत्याही आपत्तीशी संबंधित प्रतिसाद प्रक्रिया तपासण्यासाठी एखादी आपत्ती ओढवल्यानंतरच्या स्थितीचे आभासी संचलन करण्यात येते. त्यावेळी आपत्ती निवारणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाप्रमाणे सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते का नाही हे पाहण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांना देण्यात आलेल्या कृती पार पाडतात. यावरून आपण आपत्ती निवारणासाठी उभी केलेली यंत्रणा किती सक्षम आहे हे पाहू शकतो.
iii) आग लागणे या आपत्तीवर आधारित बचाव कार्याचे अग्निशामक दलाच्या जवानांमार्फत अभिरूप सराव अनेक शाळांमधून घेतले जाते. यामध्ये आग विझविण्यासंदर्भात, एखादया मजल्यावर अडकून पडलेल्या नागरिकास बाहेर काढण्यासंदर्भात तसेच आगीच्या प्रभावाखाली येऊन कपडे पेट घेतलेल्या नागरिकाला कसे वाचवावे याबाबत काही महत्त्वाच्या कृती करून दाखविण्यात येतात.
iv) पोलिस दल तसेच विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत देखील असे उपक्रम राबविण्यात येतात.