प्रभावी आपत्ती व्यवस्थापन भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते
उत्तर :
i) पर्यावरणीय संकटे ही सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांच्या परस्परक्रियातून येत असतात. तसेच पूर, वावटळी, दुष्काळ, भूकंप, जीतलहर, उष्णतेची लाट इ. चा सामना करताना भारताला बहुविध प्रकारे त्याकडे बघावे लागते.
ii) त्यासाठी सातत्यपूर्ण नियोजन समन्वय आणि अंमलबजावणीची गरज असते. त्यासाठी धोका नियंत्रण, संकटाचा सामना आणि पूनर्वसन आणि पुनर्रचना करताना केलेले उपाय यांची आवशक्यता असते.
iii) देशाला मजबूत आपत्ती व्यवस्थापन केंद्राची गरज आहे. आपत्तीचा सामना करताना ताबडतोब सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या घटकांकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यात दीर्घ मुदतीच्या पुनर्वसन धोरणाचा समावेश असावा. तसेच आपत्ती व्यवस्थापन केंद्राची स्थापना करून त्याद्वारे प्रशिक्षण दिल्यास येणाऱ्या समस्यांना प्रभावीपणे तोंड देता येईल.
iv) आपत्तीपूर्व व्यवस्थापनात प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे इत्यादीं बाबीं प्रभावी आपत्ती व्यवस्थापनात भविष्यासाठी सुसज्जता निर्माण करते.