शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा

शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा

प्रश्न 

शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती सांगा

 उत्तर 

 

शास्त्रीय व पर्यावरणस्नेही कचरा व्यवस्थापन करण्याच्या पद्धती पुढील प्रमाणे आहेत.

i) कचऱ्याचे विभाजन व वर्गीकरण - ही कचरा व्यवस्थापनातील प्राथमिक प्रक्रिया आहे. ओला व सुका कचरा वेगळा करणे गरजेचे आहे. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आवश्यक आहे.

ii) कंपोस्टिंग (सेंद्रिय खत) - घराभोवतीची जागा, बाग, गच्ची अशा ठिकाणी तुमच्या घरातील कचऱ्याचे विघटन करणे शक्य आहे. घरातील उरलेले अन्न, फळे, भाज्या यांची साले व टाकाऊ भाग, बागेतील कचरा अशा पद्धतीने कुजवल्यास तुमच्या बागेसाठी. शेतीसाठी चांगले खत बनू शकते.

iii) गांडूळ खत निर्मिती - गांडूळांचा वापर करून घनकचऱ्याचे जलद विघटन घडवून आणणारी ही सोपी पद्धत आहे. घनकचऱ्याचे खतात रूपांतर करणारे हे एक प्रभावी तंत्र आहे.

iv) सुरक्षित भूमीभरणाची स्थळे - भूमिभरण स्थळ पाण्याच्या स्थळापासून 2 किमीपेक्षा अधिक अंतरावर निवडावी. भूमिकरण करतांना मिश्र प्रकारचा कचरा एकत्र करू नये. तसेच सुरक्षित भूमिभरण स्थळांमध्ये कचरा टाकण्यापूर्वी माती व प्लास्टिकचे अस्तर घालावे. यामुळे जमीन व पाणी प्रदूषणास आळा असतो. 

v) पायरोलिसिस - यात कचऱ्याचे उच्च तापमानाला ज्वलन होत असल्याने ही प्रक्रिया वायू व विजनिर्मितीसाठी उपयोगी ठरते. अर्धवट ज्वलनशील कचरा या पद्धतीने जाळला जातो. महानगरपालिकेद्वारे केल्या जाणाऱ्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियेत ही शास्त्रीय पद्धत वापरली जाते.

vi) जैववैदयकीय कचरा व्यवस्थापन - जैवभट्टीद्वारे रोगप्रसारक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी निर्जंतुकीकरणाची शास्त्रीय पद्धत वापरली जाते. तसेच भट्टीमध्ये घनकचऱ्याचे ज्वलन करून अनावश्यक घनपदार्थ, घन अथवा वायू स्वरूपातील अवशेषांमध्ये रूपांतरित केला जातो. 



Previous Post Next Post