आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा

प्रश्न 

आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपदग्रस्तांना प्रथमोपचार कसा करावा

 उत्तर 

 

i) रक्तस्त्राव - जर आपद्ग्रस्त व्यक्तीला जखम होऊन त्यामधून रक्तस्त्राव सुरू झाला असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे दयावा. 

ii) अस्थिभग व मणक्यावर आघात - जर आपद्ग्रस्त व्यक्तीचे हाड मोडले असेल तर त्या हाड मोडलेल्या भागाचे अचलकरण करणे अत्यावश्यक असते. पाठीवर / मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्णशिबिकेवर ठेवावे.

iii) पोळणे - भाजणे - जर आपद्ग्रस्तांना आगीच्या ज्वालांनी होरपळले असेल तर त्यांना किमान 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर व होरपळलेल्या भागांवर चंड पाण्याच्या सतत धारेखाली धरणे फायदेशीर ठरते.

iv) लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुका मार - अशा परिस्थितीत RICE उपाययोजना करावी.

Rest - आपद्ग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे.

Ice - आपद्ग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटीस ठेवावे. 

Compression - बर्फाचे पोटीस थोडा वेळ ठेवल्यावर मग त्या भागाला हळूवार मसाज करावा.

Elevate - मार लागलेला भाग उंचावून ठेवावा.

v) श्वसनमार्ग - आपद्ग्रस्त व्यक्तीला श्वास घ्यायला अडचण होत असेल तर डोके उतरते करावे किंवा हनुवटीला वर उचलावे. त्यामुळे श्वासनलिका खुली राहते.

vi) श्वासोच्छवास - जर श्वासोच्छवास बंद झाला तर आपद्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोच्छवास दयावा.



Previous Post Next Post