समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान
उत्तर :
समस्थानिके म्हणजे अणू अंक तोच पण अणूवस्तुमान भिन्न असलेले मूलद्रव्याचे अणू. त्याचे रासायनिक गुणधर्म अर्थातच समान असतात. मेंडेलीव्हची सारणी अणुवस्तूमानाप्रमाणे तयार केलेली असल्यामुळे समस्थानिकांना त्या सारणीत सामावून घेणे, योग्य जागी ठेवणे शक्य नव्हते.
पण त्यानंतर मोसले या शास्त्रज्ञाने मूलद्रव्यांची मांडणी अणू अंकानुसार केली त्यामुळे समस्थानिकांना या सारणीत सामावून घेणे शक्य झाले. एकाच चोेेकटीत सर्व समस्थानिके दाखविता आली.