तुम्ही अनुभवलेल्या दोन आपत्तींची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना लिहा

तुम्ही अनुभवलेल्या दोन आपत्तींची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना लिहा

तुम्ही अनुभवलेल्या दोन आपत्तींची कारणे, परिणाम आणि केलेल्या उपाययोजना लिहा

उत्तर :

आम्ही अनुभवलेल्या दोन आपत्तींविषयींची माहिती पुढीलप्रमाणे आहेत. 

1) आग : आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग ही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक असू शकते.

कारणे : झाडे व फांद्यांचे घर्षण होऊन जंगलात आग लागली. या आगीला वणवा असे म्हणतात.

परिणाम : शेती जंगलाला लागूनच असल्याने शेतीची अवजारे, इंधन (सरपण गोवऱ्या) यांचे नुकसान झाले. तसेच जंगलात लागलेल्या आगीमुळे जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले.

उपाययोजना : सर्वप्रथम अग्निशमन दलास व पोलिसांना फोन करून बोलाविले. शेतातील विहिरीच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी माती टाकून आगीचा भडका कमी करण्याचा प्रयत्न केला. 

2) पूर : पूर ही निसर्गनिर्मित आपत्ती आहे. परंतु याला मानवही तितकाच जबाबदार आहे.

कारणे : नाल्यात अतिक्रमण,वाढता कचरा यामुळे नाल्याचे पात्र उथळा झाले. अतिवृष्टीमुळे नाल्यातील अतिरिक्त पाणी वाढून पूरस्थिती निर्माण झाली. 

परिणाम : पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी झाली. घरे, शासकीय कार्यालये, धान्य कोठार, बँक यात पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य व पैसा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक सुविधा विस्कळीत झाली. 

उपाययोजना : पूर स्थितीतून बचाव करण्यासाठी मोठ्या व्यक्तींच्या मदतीने घरातील वृद्ध =, लहान मुले यांना घेऊन उंच जमिनीवर गेलो. वीजेच्या पाण्याशी जिथे संपर्क आला तिथे वीज प्रवाह बंद केला दक्षता विभागाला फोन करून मदत मिळविली. पूर स्थिती पूर्णपणे ओसारल्यानंतर नाल्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावली व त्यात परत कचरा जमा होणार नाही याची काळजी घेतली. 

 

Previous Post Next Post