आपद्ग्रस्ताचे/ रुग्णाचे वहन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात ? का ?

आपद्ग्रस्ताचे/ रुग्णाचे वहन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात ? का ?

आपद्ग्रस्ताचे/ रुग्णाचे वहन करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात ? का ?

उत्तर :

आपद्ग्रस्ताची/रुग्णांची शारीरिक स्थिती कशी आहे यानुसार वहन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती ठरतात. त्या पुढीलप्रमाणे आहेत. 

i) पाळणा पद्धत : मुले तसेच कमी वजनाचे रुग्ण यासाठी उपयुक्त पद्धत असते. 

ii) पाठुंगळीला मारणे : रुग्ण जर शुद्धीवर असेल तर उपयुक्त पद्धत असते.

iii) मानवी कुबडी पद्धत : एकाच पायाला जखम /मार असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन नेणे. 

iv) खेचून नेणे किंवा उचलून नेणे : बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी ही पद्धत उपयुक्त असते.

v) चार हातांची बैठक : जेव्हा रुग्णाच्या कमरेखालील अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा ही पद्धत वापरली जाते. 

vi) दोन हातांची बैठक : जे रुग्णआधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात. त्यांच्यासाठी ही पद्धत वापरली जाते. 

vii) स्ट्रेचर : आपत्तीकाळात घाईगडबडीच्या वेळी नेहमीचे स्ट्रेचर उपलब्ध होईलच असे नाही, अशा वेळेस उपलब्ध वस्तुंचा जसे बांबू दरवाजे, ब्लँकेट, रग, चादर यांचा वापर करून स्ट्रेचर बनवावे.

Previous Post Next Post