तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल ? का ?
उत्तर :
आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात पुढील बाबी तपासून पाहू.
i) शाळेचा पूर्ण नकाशा.
ii) शाळेत ये-जा करण्याच्या सर्व मार्गाची सूची
iii) आपत्ती व्यवस्थापन संदर्भात लागणारे उपलब्ध साहित्य व त्यांची जागा यांची सूची. उदा. दोरी, पाण्याचा होेद, काठ्या, प्रथमोपचार पेटी, पोती इत्यादी.
iv) आपत्ती व्यवस्थापनासाठी जी अत्यावश्यक माहिती शाळेच्या दर्शनी भागात सतत हवी तिच्या संकलनासाठी तक्त्यांचे स्वरूप इत्यादी बाबी तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच शासकीय अधिकारी, स्थानिक नेतेम सेवाभावी संस्था, डॉक्टर्स, फायरब्रिगेड इ. संपर्काचे पत्ते, फोन नं. दर्शनी भागात ठळकपणे मांडणे आवश्यक आहे. कारण आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्याना स्वत:चा बचाव करता यावा.