प्रश्न |
भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करा |
उत्तर | भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती - i) 'भारतीय वैद्यकीय उत्तर अनुसंधान परिषद' या संस्थेने विविध रोगांवर संशोधन करणारी २६ केंद्रे देशभर सुरू केली. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले. ii) याच क्षेत्रातील प्रगत वैदयकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' या संस्थेची स्थापना झाली. iii) या संस्थेवर वैदयकशास्त्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली गेली. iv) वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविदयालये, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे ही या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये होत. v) सर्वसामान्यांना माफक दरात वैदयकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालये, हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली. iv) सरकारने वैदयकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी १९५८ मध्ये 'मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया' या संस्थेचे पुनर्गठन केले. या संस्थेवर वैदयकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चिती व देखरेख आणि तपासणीची जबाबदारी टाकली. |
.