आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती

आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती

आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे कोणती

उत्तर :

आपत्ती लहान असो वा मोठी, अल्पकालीन असो वा दीर्घकालीन, त्यावर मात करणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 

i) आपत्ती काळात मानवी समाजावर ओढवलेली जीवित हानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे. 

ii) जीवनावश्यक वस्तुंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता व आपत्तीनंतर येणारे दुःख दूर करणे. 

iii) आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे. 

iv) आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने करणे. 

v) आपत्तींवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळात अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही किंवा झाल्यास त्याची तीव्रता कमी पोहोचेल याची काळजी घेणे..

Previous Post Next Post