संकल्पना स्पष्ट करा धवलक्रांती
उत्तर :
i) डॉ. वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले यालाच 'धवलक्रांती' असे म्हणतात.
ii) धवलक्रांती 'ऑपरेशन फ्लड' या नावाने ओळखली जाते. ऑपरेशन फ्लड ही भारतातील योजना आहे. ज्याद्वारे भारतातील दुग्धउत्पादनातील कमतरता दूर केली जाऊ शकते.
iii) जगातील कमी दुग्धोत्पादक म्हणून ओळखला जाणारा भारत देश आज धवलक्रांतीमुळे जगातील सर्वांत मोठा दुग्धोत्पादक देश म्हणून ओळखला जातो.