संकल्पना स्पष्ट करा जागतिकीकरण
उत्तर :
i) विश्वात एककेंद्रिय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, अधिक गुंतवणूक करून औदयोगिकीकरण वाढविणे आणि आयात व निर्यात सुलभतेने करता येण्याची स्थिती निर्माण करणे याला जागतिकीकरण असे म्हणतात.
ii) डॉ. दीपक नायर यांच्या मते, 'राष्ट्रराज्यांच्या भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय.'
iii) जागतिकीकरण म्हणजे सर्व राष्ट्रांची एक बाजारपेठ निर्माण करणे आणि त्या बाजारपेठेत जगातील साधनसामग्री आणि भांडवलाचे सुलभ परिचलन (देवाणघेवाण) निर्माण करणे होय. - श्रवणकुमारसिंग
iv) माल्कन आदिशेष्य यांच्या मते, 'जागतिक अर्थव्यवस्थेची निर्मिती होत असताना तिला मिळालेले जागतिक परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण होय.'