काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विदयुत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात

काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विदयुत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात

 स्पष्टीकरणासह लिहा

प्रश्न

काही किरणोत्सारी पदार्थांतून येणारे प्रारण विदयुत क्षेत्रातून जाऊ दिल्यास मार्गातील फोटोग्राफिक पट्टीवर तीन ठिकाणी खुणा दिसून येतात

उत्तर

i) रूदरफोर्ड आणि विलार्ड यांनी विविध किरणोत्सारी पदार्थांतून, उत्सर्जित होणाऱ्या प्रारणांचा अभ्यास करण्यासाठी प्रारणे विदयुत क्षेत्रातून जाऊ दिली व त्यांच्या मार्गात फोटोग्राफिक पट्टी धरली तेव्हा त्यांना प्रारणांचे तीन प्रकारे विभाजन झाल्याचे आढळले. 

ii) एक प्रारण ऋण प्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झाल्याचे आढळले तर दुसरे प्रारण धन प्रभारित पट्टीकडे अधिक प्रमाणात विचलित झाल्याचे दिसले. परंतु तिसऱ्या प्रारणांचे विद्युत क्षेत्रात अजिबात विचलन झाले नाही. 

iii) ऋणप्रभारित पट्टीकडे किंचित विचलित झालेल्या किरणांना अल्फा किरणे, धनप्रभारित किरणांना बिटा किरणे आणि अजिबात विचलित न झालेल्या किरणांना गॅमा किरणे म्हणतात.

Previous Post Next Post