सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते
उत्तर :
सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे सामान्य माणसाला पुढील दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
i) वेबसाईट्सवर उत्कृष्ट वस्तू दाखवणे व प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा बिघाड असणारी उपकरणे पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
ii) बँकेची डेबिट/क्रेडिट कार्ड्स यांचे पिन क्रमांक वापरून ग्राहकांच्या खात्यातील पैशांचे व्यवहार परस्पर केले जातात.
iii) इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून बदनामीकारक संदेश पाठविले जातात. अश्लील चित्रे प्रसारित केले जातात. प्रक्षोभक विधाने पाठवून नागरिकांना मानसिक त्रास दिला जातो.