ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते

उत्तर :

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग पुढीलप्रमाणे आहेत. 

i) सार्वजनिक उद्यानामध्ये सकाळी एकत्र जमून मोठमोठ्याने हसावे. मनमोकळे हसल्याने ताणतणाव हलका होतो.

ii) मित्र-मैत्रिण, समवयस्क , भाऊ-बहिणी, शिक्षक व पालक या सर्वांशी मनमोकळा संवाद साधावा. तसेच जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करणे, मनातले विचार लिहून काढणे, हसणे अशा 'व्यक्त होण्याने' ताणतणाव कमी होण्यास मदत होते. 

iii) त्याचप्रमाणे वस्तुंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन करणे, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य असे छंद जोपासल्याने ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आपल्याला असणारा रिकामा वेळ सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळल्याने नकारात्मक घटक दूर जातात व आपला तणाव कमी होतो.

Previous Post Next Post