जैवतंत्रज्ञान जसे उपयुक्त आहे तसेच काही प्रमाणात हानिकारकही आहे, यावर तुलनात्मक लेखन करा
उत्तर :
कुठलेही नवीन तंत्रज्ञान उदयास आले की त्याच्या फायद्याबरोबर तोटेही असतातच. जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तुंच्या उत्पादनातील पदार्थांचा तसेच लागणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी झाला. लागवड वाढली तसेच उत्तमरित्या उत्पादन मिळू लागले. शेती, वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून त्याचा फायदा झालेला आढळून येतो. त्याचबरोबर तोटा म्हणजे जैवतंत्रज्ञानासाठी मोठमोठ्या जागेची आवश्यकता असून त्यासाठी खर्चही जास्त लागतो. जैवतंत्रज्ञानासाठी आवश्यक गोष्टी या महागड्या असतात. जैवतंत्रज्ञानात बिघाड झाल्यास अनावश्यक विकृत प्रजाती निर्माण होऊ शकते ज्याचा पर्यावरणावर वाईट परिणाम पडू शकतो.