संकल्पना स्पष्ट करा पोटगी
उत्तर :
i) एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठरावीक रक्कम नवऱ्याने देणे याला पोटगी असे म्हणतात.
ii) सर्वोच्च न्यायालयात मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो बेगम खटल्यात शाहबानो यांस पोटगी मागण्याचा अधिकार आहे. असा निर्णय न्यायालयाने दिला. मात्र धार्मिक संघटनांनी याविरुद्ध गदारोळ केला.
iii) परिणामत: संसदेत 'मुस्लिम वुमेन अँक्ट' (प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन डायव्होर्स) संमत झाला.