अंतर्गोल भिंगाचे उपयोग

अंतर्गोल भिंगाचे उपयोग

अंतर्गोल भिंगाचे उपयोग

उत्तर :

i) वैद्यकीय उपकरणे, स्कॅनर तसेच सी. डी. प्लेअर या उपकरणांमध्ये लेझर किरणांचा वापर करतात. या उपकरणांचे कार्य योग्य रितीने चालण्यासाठी त्यांमध्ये अंतर्गोल भिंगांचा वापर करतात. 

ii) दरवाजावरील नेत्रदर्शिका या छोट्या संरक्षक उपकरणाच्या साहाय्याने दरवाजाच्या बाहेरील परिसराचे अधिकाधिक विस्तीर्ण दृश्य पाहता येते. यामध्ये एक किंवा अधिक अंतर्गोल भिंगे वापरतात. 

iii) चष्मे : निकटदृष्टिता या दोषाचे निराकरण करण्यासाठी चष्म्यामध्ये अंतर्गोल भिंगे वापरतात. 

iv) विजेरी : बल्बद्वारा निर्माण झालेला प्रकाश विस्तृतपणे विखुरण्यासाठी (अपसारित करण्यासाठी) अंतर्गोल भिंग वापरतात. 

v) कॅमेरा, दुर्बीण व दूरदर्शी  यांत प्रामुख्याने बहिर्गोल भिंग वापरतात. प्रतिमांचा दर्जा उत्तम मिळण्यासाठी यांत नेत्रभिंगाच्यापुढे किंवा नेत्रभिंगाच्या पुढे किंवा नेत्रभिंगामध्ये अंतर्गोल भिंग वापरतात.    


Previous Post Next Post