संकल्पना स्पष्ट करा अल्पसंख्याक

संकल्पना स्पष्ट करा अल्पसंख्याक

संकल्पना स्पष्ट करा अल्पसंख्याक

उत्तर :

i) अल्पसंख्याक म्हणजे एखादया समाजात धार्मिक, भाषिक किंवा वांशिकदृष्ट्या संख्येने कमी असलेल्या व्यक्तींचा समूह होय. 

ii) आपल्या देशात विविध धर्म, पंथ आणि भाषा असल्यामुळे भारतात सांस्कृतिक विविधता आहे. 

iii) सांस्कृतिक परंपराही वेगवेगळ्या आहेत. या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषेचा विकास करता यावा यांसाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क दिले आहेत. 

iv) अल्पसंख्य असलेल्या गटांना आपापली भाषा, संस्कृती, परंपरा यांचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा हक्क आहे. त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन करण्याचा त्यांना हक्क आहे. त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात.

Previous Post Next Post