कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्यामागची कारणे काय आहेत
उत्तर :
कार्बनच्या सहसंयुगबंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो.
i) शृंखलाबंधन शक्ती : कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणुबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची क्षमता आहे. त्यातुन मोठे रेणू तयार होतात. कार्बनच्या या गुणधर्माला शृंखलाबंधन शक्ती म्हणतात. शृंखला मुक्त सरळ व वलयाकार असू शकतात.
ii) कार्बन कार्बन अणुमध्ये एक किंवा दोन किंवा तीन सहसंयुज बंध तयार होतात, यांना आपण अनुक्रमे एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध म्हणतो. या क्षमतेमुळे कार्बनी संयुगाची संख्या आणखी वाढते.
iii) कार्बनची संयुजा चार आहे त्यामुळे टो इतर चार अणुंशी सहसंयुज बंध तयार करू शकतो हे ही त्यांची संख्या वाढण्याचे कारण आहे.