प्रश्न | संकल्पना स्पष्ट करा राजकारणाचे गुन्हेगारीकरण |
उत्तर | i) राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तींचा समावेश होणे, म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गांनी होत असते.. ii) पैसा आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारांमध्ये दहशत निर्माण करतात. iii) निवडणुकांच्या काळात हिंसाचार घडवून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकीट देतात. iv) असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात. आर्थिक घोटाळे करतात. विरोधकांना त्रास देतात. काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले की लोकशाही कमकुवत होते. |