प्रश्न | संकल्पना स्पष्ट करा भ्रष्टाचार |
उत्तर | i) कायदा मोडून वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना नाडणे याला 'भ्रष्टाचार' असे म्हणतात. ii) भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो, असे नाही, तर सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो. iii) अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच असतो. निवडणुकीतील गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच. iv) भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांत भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडू शकतो. |