संकल्पना स्पष्ट करा सांस्कृतिक पर्यटन

संकल्पना स्पष्ट करा सांस्कृतिक पर्यटन

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा सांस्कृतिक पर्यटन

 उत्तर 


i) भारताला विविध ललितकलांचा वारसा लाभलेला आहे. ठिकठिकाणी ललित महोत्सव साजरे होत असतात. या महोत्सवांसाठी केल्या जाणाऱ्या पर्यटनाला 'सांस्कृतिक पर्यटन' असे म्हणतात.

ii) ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणे, एखादया स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास समजून घेण्यासाठी त्या स्थळाला भेट देणे हे सांस्कृतिक पर्यटन होय. 

iii) दर्जेदार शिक्षण संस्थांना भेटी देऊन त्यांच्या परंपरा समजून घेण्यासाठी केलेले पर्यटन, विविध भागांतील सण-उत्सवांच्या पद्धती पाहण्यासाठी केलेले पर्यटन हे सांस्कृतिक पर्यटनातच मोडते.

iv) अनेक ठिकाणी होणाऱ्या नृत्य, संगीत महोत्सवात भाग घेण्यासाठी किंवा प्रेक्षक म्हणून सहभागी होण्यासाठी केलेल्या पर्यटनाचा समावेशही सांस्कृतिक पर्यटनात होतो.

Previous Post Next Post