संकल्पना स्पष्ट करा वारसा मुशाफिरी (हेरिटेज वॉक)

संकल्पना स्पष्ट करा वारसा मुशाफिरी (हेरिटेज वॉक)

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा वारसा मुशाफिरी (हेरिटेज वॉक)

 उत्तर 


 उत्तर : i) ऐतिहासिक वारसास्थळाला भेट देण्यासाठी चालत जाणे, याला 'वारसा मुशाफिरी' (हेरिटेज वॉक) असे म्हणतात. राजवाडे, ताजमहालसारखी स्मारके, किल्ले, प्राचीन मंदिरे इत्यादी पाहण्यासाठी आपण जो चालत प्रवास करतो, त्याला 'हेरिटेज वॉक' असे म्हणतात.

ii) इतिहास जेथे घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन तो इतिहास जाणून घेणे, ही अनुभूती हेरिटेज वाॅकमध्ये येते.

iii) अनेक हौशी संघटना गडकिल्ल्यांची भ्रमंती घडवून आणतात. पुणे-मुंबई शहरात प्रवाशांना तेथील प्राचीन वास्तूंचे दर्शन घडवतात. यालाही वारसा मुशाफिरी किंवा हेरिटेज वॉक असे म्हणतात.

iv) अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. हेरिटेज वॉकला प्रसिद्धी मिळावी व पर्यटक आकर्षित व्हावेत म्हणून अनेक उपक्रम चालवले जातात.

Previous Post Next Post