संकल्पना स्पष्ट करा पर्यटन

संकल्पना स्पष्ट करा पर्यटन

प्रश्न 

संकल्पना स्पष्ट करा पर्यटन

 उत्तर 


i) दूरवरच्या स्थळांना विशिष्ट हेतूने भेट देण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे 'पर्यटन' होय. आपल्या राहत्या घरापासून विविध कारणांसाठी काही काळ दूर जाणे म्हणजे 'पर्यटन' होय. पर्यटन ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. 

ii) पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे. पर्यटनाचे हेतू व स्वरूप मात्र काळाप्रमाणे व गरजेप्रमाणे बदलत जातात.

iii) आधुनिक काळात वाहतुकीच्या सुविधांमुळे पर्यटन सोपे व गतिमान झाले आहे. विसाव्या शतकात तर पर्यटनाकडे 'आधुनिक उद्योग' म्हणूनच पाहिले जाते.

iv) स्थानिक पर्यटन ते आंतरराष्ट्रीय पर्यटन असा पर्यटनाचा विस्तार होत जातो. वाढत्या पर्यटनाचा देशाला फायदाच होतो.


Previous Post Next Post